‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. आज जगभरात वनिताचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. उत्तम अभिनयाने, आणि सादरीकरणाने वनिताने आजवर प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे. पाहा वनिताच्या सासूबाईंनी वनिताला काय काय केलंय. (Vanita kharat post)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची टीम काही दिवसांसाठी परदेश दौरा करण्यास गेली होती. परदेशांत असणाऱ्या चाहत्यांना भेटता यावं, त्यांच्यासमोर सादरीकरण करता यावं म्हणून हास्यजत्रेची टीम अमेरिका दौरा करत होती. बराच काळ घरापासून दूर राहिल्याने हास्यजत्रेची टीम घराला मिस करत होती. वनिताचा पती सुमितने देखील तिला मिस करत असल्याची पोस्ट शेअर केली होती.
पाहा वनिताच्या सासूबाईंनी वनिताला काय काय केलंय (Vanita kharat post)
अशातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची टीम भारतात पुन्हा परतली आहे. वनिताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘एक महिन्यानंतर घरचं जेवण, आय लव्ह यु सासूबाई, मम्मे’ असं म्हणत तिने घरच्या जेवणाचा एक फोटो पोस्ट केला आहे. चित्रीकरणासाठी घरापासून जेव्हा बराच काळ दूर राहावं लागत तेव्हाच आपल्याला घराची. घरच्या जेवणाची आठवण येत असते. वनिताही तिच्या घरच्या जेवणाला मिस करत होती, वनिताने सासूबाईंच्या हातच्या जेवणाचा फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. सासूबाईंच्या हातचं जेवण जेवून वनिता तृप्त झाली आहे.
हे देखील वाचा – मृणालची लेकीसोबत न्यूयॉर्क ट्रिप, प्रेक्षकांना येतेय मृणालची आठवण
काही दिवसांपूर्वी वनिताने सुमित लोंढे सोबत लगीनगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे हळदीचे अनेक फोटो सोशल मिडियावर वाऱ्यासारखे पसरले होते. शिवाय वनिता सुमितचे लिपलॉक करतानाचे व्हिडिओही सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी चर्चेत होते.
