अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने विविध मालिका, महाराष्ट्राची हास्यजत्रा-कॉमेडीची बुलेट ट्रेन यासारखे कार्यक्रम यांद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार हे तिच्या विनोदी कौशल्याने चाहत्यांचे मनोरंजन करते. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते.गेल्या काही काळापासून विशाखा रंगभूमीचीही सेवा करत आहे.सध्या तिच्या अश्याच कुर्रर्रर्र या नाटकाची सर्वत्र चर्चा रंगली. रंगभूमीवर तर हे नाटक धुमाकूळ घालतंय. या नाटकात प्रसाद खांडेकर,नम्रता संभेराव,पॅडी कांबळे हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळतात. सध्या या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत सुरु आहेत.कलाकार सध्या अमेरिकेत एन्जॉय करत असून तिकडचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात .तर त्यांच्या या फोटोंची सोशल मीडियावर हवा पाहायला मिळते. यातीलच एका अभिनेत्रींच्या फोटोंने सगळ्यांचं लक्ष वेधलं. ती अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार(Vishakha Subhedar)

विशाखाने तिच्या इंस्टाग्रामवर अमेरिकेतील एक फोटो शेअर केला यात तिचा लूक पाहून खरं तर चाहहते चकित झाले. यात तिने रेड कलरचा वनपीस आणि त्यावर ब्लॅक शर्ट परिधान केलं.walk of fame hollywood ,जैसा देश वैसा वेष असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिल. तिचा हा लूक पाहून अनेक चाहते घायाळ झालेत.तिच्या या फोटोवर चाहत्यांनी तिला सिमरन,नुसता धुराळा,ये बात महाराष्ट्राची अँजोलिना जॉली असं म्हटलंय. यामुळे तिच्या या फोटोची चर्चा सर्वत्र रंगली.(Vishakha Subhedar)
हे देखील वाचा: लक्ष्मीच्या तोंडून शिवी ऐकून जयदीपचा राग अनावर! जयदीपचा राग अनावर!
विशाखा ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग होती. तिने हास्यजत्रा सोडल्याने अनेक चाहत्यांनी नाराजगी व्यक्त केली. आजही अनेक चाहते तिला पुन्हा हास्यजत्रेत या अशी विनंती करत आहेत.विशाखाने हास्यजत्रा सोडली असली तरी तिची हास्यजत्रेतील कलाकारांसोबत एक घनिष्ट मैत्री असलेली पाहायला मिळते. विशाखा ही सध्या शुभविवाह या मालिकेत एक नकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करते. मालिकेसोबतच विशाखा गरम किटली या चित्रपटातून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ती अभिनयासोबतच उत्तम नृत्यांगना देखील आहे. ती अनेक डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते आणि या व्हिडिओला चाहत्यांची देखील चांगली पसंती मिळते.
