शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ना डिझाइनर कपडे, ना अवाढव्य खर्च; इतक्या साधेपणात केलं पृथ्वीक प्रतापने लग्न, साऊथ इंडियन स्टाइल लूकची चर्चा

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 25, 2024 | 3:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame Prithvik Pratap got married and his wedding look has attracted attention

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापने नुकतेच लग्न केले असून या लग्नाच्या लूकने लक्ष वेधलं आहे

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमांतून अनेक नवोदित कलाकारांना प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करण्याची नवीन संधी मिळाली. हास्यजत्रेच्या माध्यमातून पृथ्वीक प्रताप हा अभिनेताही घराघरांत पोहोचला आहे. अभिनेत्याने नुकतीच त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे  त्याने नुकतेच लग्न केले आहे. त्याने आपल्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पृथ्वीकने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हे नवीन फोटो शेअर केले आहेत. (Prithvik Pratap Marriage)

लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत पृथ्वीकने आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली असल्याचे जाहीर केलं आहे. लग्नाचे खास फोटो शेअर करत त्याने “२५-१०-२०२४… एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने.” असं सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. पृथ्वीकच्या लग्नाचे फोटो पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अभिनेत्री श्रुती मराठे, अश्विनी महांगडे, प्रथमेश शिवलकर, अमृता खानविलकर, अक्षया नाईक, प्रथमेश परब, साक्षी गांधी, गौरी कुलकर्णी, स्वानंदी टीकेकर, सिद्धार्थ बोडके, गौरी नलावडे, अशा अनेक कलाकारांनी पृथ्वीकला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by PRITHVIK PRATAP (@prithvikpratap)

आणखी वाचा – वाढलेलं पोट, वजन, हाताला दुखापत अन्…; अभिषेक बच्चनची अशी अवस्था का?, फोटो व व्हिडीओ समोर

पृथ्वीकचे ही लग्नाचे फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोमध्ये पृथ्वीकने पांढरा कुर्ता व त्यावर धोतर आणि पायात मोजडी असा खास लूक आहे. तसंच या पेहरावावर त्याने मोगऱ्याच्या फुलांच्या वरमाळा परिधान केल्या आहेत. तसंच त्याची पत्नी प्राजका हिने ऑफ व्हाईट व सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे. तर या साडीवर गळ्यात सुंदर हार आणि कानात झुमके असे साजेसे दागिनेही परिधान केले आहेत. हातावरील मेहंदी व हिरव्या बांगड्यादेखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

आणखी वाचा – ‘पारू’ मालिकेची टीआरपीच्या शर्यतीत बाजी, सेटवरही जंगी सेलिब्रेशन, आदित्य-पारूच्या नात्यातील गोडव्याला प्रेक्षकांची पसंती

पृथ्वीकने त्याच्या लग्नाचे तीन फोटो शेअर केले आहेत. यापैकी पहिल्या फोटोमध्ये दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला असून या फोटोमध्ये पृथ्वीकच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेजे कॅमेऱ्याकडे बघून स्माईल केली असल्याचे पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये दोघे एकमेकांकडे प्रमाने बघत चालत येत असल्याचे दिसत आहे.   

Tags: Prithvik Pratap MarriagePrithvik Pratap Marriage Marathi NewsPrithvik Pratap Marriage News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Prithvik Pratap Wedding

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची बायको दिसते इतकी सुंदर, कलाकारांकडून सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा पाऊस

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.