मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी केवळ सौंदर्यालाच नव्हे तर त्यांच्या फिटनेसलाही तितकेच महत्त्व देतात आणि यात केवळ अभिनेत्रींचा नाही तर अभिनेत्यांचादेखील समावेश आहे. मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेते फिट व तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करत आपल्या चाहत्यांनाही प्रेरणा देत असतात. अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याने फिट होत त्याचा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे आणि हा लोकप्रिय अभिनेता म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रथमेश शिवलकर.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी बाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. म्हणून या कार्यक्रमासह यातील कलाकारांचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता प्रथमेश शिवलकरने डाएट करत स्वत:ची शरीरयष्टी सुधारली असल्याची पोस्ट शेअर केली आहे. प्रथमेश डाएट करत असून तीन महिन्यांच्या डाएटच्या प्रवासानंतरचा एक खास फोटो त्याने शेअर केला आहे. तसेच या फोटोमध्ये तो खूपच बारीक झाला असल्याचे दिसून येत आहे.
हा खास फोटो शेअर करत त्याने त्याचा डाएट मंत्रदेखील सांगितला आहे. “फॅट टू फिट होण्याच्या ३ महिन्यांच्या प्रवासानंतरचा माझा पहिला फोटो.” असं म्हणत त्याने हा खास फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर त्याने पुढे ‘डाएट… व्यायाम… मसल… ट्रेनिंग… योग… मेडिटेशन…’ हेच पुन्हा पुन्हा केले. यामुळे सकारात्मक उत्साह मिळाल्याचेही म्हटले आहे. यापुढे त्याने “हे स्वतःसाठी करा, इतरांसाठी नको” असं म्हणत “महत्त्वाचं नो चीट डे” असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – माहेरची साडी सेंटर, चाळ व मेट्रो स्टेशन, इतका भव्यदिव्य आहे डॉ. निलेश साबळेच्या नव्या शोचा सेट, पाहा व्हिडीओ
प्रथमेशचा या लूकमधील फोटो त्याच्या चाहत्यांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तसेच त्याला या लूकमध्ये पाहून अनेकजण अवाकदेखील झाले आहेत. प्रथमेशने शेअर केलेल्या या फोटोला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच या फोटोखाली “एक नंबर, हँडसम, खूप छान, खूपच सुंदर, असाच कायम करत रहा’ अशा कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्याला प्रोत्साहनही दिले आहे.