रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : जिंकलंस पोरा! गावच्या जत्रेसाठी कोकणात पोहोचला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, ट्रकनेच केला प्रवास, साधेपणाचं होत आहे कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
मे 3, 2024 | 2:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame Nikhil Bane shared special video of his village's palkhi ceremony

Video : जिंकलंस पोरा! गावच्या जत्रेसाठी कोकणात पोहोचला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, ट्रकनेच केला प्रवास, साधेपणाचं होत आहे कौतुक

गुढीपाडवा झाला की, कोकणात सर्वत्र यात्रा व जत्रा सुरु होतात. यानिमित्ताने कोकणात आता सर्वत्रचं उत्साहाच आणि भक्ती-भावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईतून अनेक चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी अनेक चाकरमनी सध्या कोकणात गेले आहेत. असाच एक मराठी कलाकारदेखील जत्रेनिमित्त कोकणात गेला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे निखिल बने. दरवर्षी सणउत्सवानिमित्त निखिल आपल्या गावी कोकणात जातो. अशातच आता तो नुकताच गावच्या जत्रेनिमित्त कोकणात गेला असून याचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्याने काही दिवसांपूर्वी तो कोकणात गेल्याचा व्हिडीओ शेअर केला होता, यांमध्ये त्याने ट्रेन व एसटी बसमधून प्रवास करतानाचे पाहायला मिळाले. अशातच निखिलने त्याच्या गावच्या जत्रेचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)

निखिलने एक छोटासा व्लॉग व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये त्याने गावच्या जत्रेची खास झलक शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या पोसरे व कापरे गावची जत्रा खास झलक दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये देवाचा पालखी सोहळा, गावच्या देवाचे नवीन मंदीर तसंच कोकणातील पारंपरिक वाद्यावर गावच्या देवाच्या भेटीची काही खास क्षणचित्रेदेखील पहायला मिळत आहे.      

आणखी वाचा – केतकी-फाल्गुनीने विरोचकाच्या सांगण्यावरुन अन्न-पाणी सोडलं, रुपालीची राजाध्यक्षांच्या विरोधात पोलिसांत तक्रार, नेत्रा भडकली अन्…

यानंतर कोकणातील प्रत्येक गावात जत्रेनंतर मनोरंजनासाठी आयोजित केला पारंपरिक लोककलाप्रकार नमनचे काही खास क्षण शेअर केले आहेत. यावेळी निखिलने खूप दिवसांनी असं नमन बघितलं असल्याचंही या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. यानंतर निखिलने पोसरे गाव ते त्याचं  घर हा प्रवास टेम्पोतून केल्याचेही या व्हिडीओच्या शेवटी पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने तीन महिन्यांमध्येच घटवलं इतकं वजन, आता ओळखणंही झालं कठीण, म्हणाला, “डाएट आणि…”

दरम्यान, निखिलने शेअर केलेल्या या व्हिडीओला अमेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी त्याच्या या साधेपणाचे कौतुकही केले आहे. “जमिनीवर पाय असलेला आमचा चिपळूणकर हिरो”, “भावा खूप मोठा हो”, “बने भाऊ तुम्ही किती साधे राहता”, “तुम्ही एवढे साधेपणाने राहणारे असाल, असं खरंच वाटलं नव्हतं”, “साधे सरळ सोपे जीवन” अशा अनेक कमेंट्स करत त्याच्या व्हिडीओखाली त्याला प्रतिक्रिया दिल्या आहेत.         

Tags: maharashtrachi hasyajatramarathi entertainment newsnikhil bane
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
kapil sharma new show off air

मोठा धक्का! कपिल शर्माचा नवीन शो दोन महिन्यांतच बंद होणार, पण यामागचं खरं कारण काय?, सत्य समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.