महाराष्ट्राचा लाडका विनोदी कार्यक्रम म्हणजे ” महाराष्ट्राची हास्य जत्रा” हा कार्यक्रम ओळखलो जातो तो दर्जेदार हास्य विनोद आणि कलेचं उत्तम या गोष्टींसाठी. विनोदाच्या या तुफान हास्य जत्रेत समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, रोहित माने, चेतना भेट, पृथ्वीक प्रताप, श्याम राजपूत, नम्रता संभेराव, अशा अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.(Chetna Bhat Shyam Rajput)
महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आपल्याला हास्य जत्रेची क्रेझ पाहायला मिळते.सध्या एक व्हिडीओ चॅनलचा गाजतोय तो म्हणजे अभिनेत्री चेतना भेटचा भाचा अन्वयचा. चेतनच्या भाच्याने हास्यजत्रेतील चेतनाचा सहकारी आणि खान्देशी भाषा बोलण्यासाठी ओळखला जाणारा श्याम राजपूत याची मजेशीर नक्कल केली आहे. श्याम ने स्वतः अन्वयचा हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. श्याम ने पोस्ट केलेल्या या व्हिडिओ वर हास्य जत्रेतील अन्य कलाकार आणि प्रेक्षकांनी सुद्दा कमेंट्स केल्या आहेत.
चेतनाच्या भाच्याचा मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/reel/Cs85qKbJpPr/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
श्यामने आपल्या खान्देशी भाषेने महाराष्ट्राच्या हाजत्रेत आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. हास्यजत्रेत अनेक कलाकार आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना आकर्षित करतात. कॉमेडीची बुलेट ट्रेन या मालिकेतून श्यामच्या विनोदाला नवीन ओळख मिळाली. तिथं पासून आपल्या अहिराणी बोलीत श्याम ने आपलं प्रत्येक स्किट अगदी मजेशीर बनवलं आणि प्रेक्षकांच्या तो पसंतीस उतरला. (Chetna Bhat Shyam Rajput)
श्याम फक्त एक अभिनेता म्हणूनच नाही तर सहाय्कक दिगदर्शक म्हणून सुद्धा ओळखला जातो. सचिन गोस्वामी यांच्या पुणे व्हाया बिहार या चित्रपटात श्याम हा सहायक दिगदर्शक होता तर सोबतच त्याने या चित्रपटात छोटी भूमिका देखील केली होती. ही भूमिका साकारताना त्याने भरत जाधव यांच्या सोबत साकारली होती. या सर्व प्रवासातून श्याम आता हास्य जत्रेतून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना पाहायला मिळतोय.