मंगळवार, ऑगस्ट 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऐन वारीत पावसाचं थैमान, अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या आळंदीसाठी 10 कोटींची मदत, युद्धपातळीवर काम सुरु

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 8, 2026 | 10:02 am
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Maharashtra Flood News

ऐन वारीत पावसाचं थैमान, अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या आळंदीसाठी 10 कोटींची मदत, युद्धपातळीवर काम सुरु

Maharashtra Flood News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि भीषण पुरामुळे श्रीक्षेत्र आळंदीतील नागरी आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याअंतर्गत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने तेथील मूलभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना सर्व विकास कामे तातडीने व युद्धपातळीवर सुरू करावीत, अशा सूचना दिल्या आहेत. आगामी आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आणि भाविक आळंदीत दाखल होत आहेत. मात्र अतिवृष्टी आणि पुरामुळे भाविकांसाठी बांधलेली तात्पुरती स्वच्छतागृहे वाहून गेली आहेत. तसेच आळंदीचे जलशुद्धीकरण केंद्र पाण्यात बुडाले असून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनही मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे. अनेक ठिकाणी पथदिवे पडले आहेत, बहुतांश रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून नदीकाठावर बांधलेल्या सुरक्षा रेलिंगही अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक व भाविकांचे प्रचंड हाल होत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाविकांची गैरसोय दूर करून परिस्थिती सुरळीत करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दुपारी आळंदी नगरपरिषदेच्या मुख्यमंत्र्यांशी थेट दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. याशिवाय आळंदीत पोहोचलेल्या वारकऱ्यांशीही त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीनंतर नगरविकास विभागाने आळंदीच्या तातडीच्या कामांसाठी तातडीने 10 कोटी रुपये मंजूर केले आणि काही तासांतच यासंदर्भात शासन आदेश (जीआर)ही काढण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने घटनास्थळी काम सुरू केले आहे.

आणखी वाचा – “माझे मुलींशी संबंध आहेत”, गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचा ऑन कॅमेरा खुलासा, ढसाढसा रडली

मंजूर झालेल्या 10 कोटी रुपयांपैकी 5 कोटी रुपये “विशेष अनुदान” अंतर्गत दिले जातील.

पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था आणि इतर आवश्यक कामांसाठी 3 कोटी रुपये.
नवीन पथदिवे व खांब बसवण्यासाठी एक कोटी रु.

भाविकांसाठी स्वच्छतागृहे आणि स्वच्छता सुविधेसाठी एक कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

आणखी वाचा – “त्याचे ५० अफेअर असले तरी तुझ्या बापाचं काय?”, गोविंदाबाबत बोलणं पत्नील भोवलं, नेटकरी म्हणाले, “तिचा धंदा…”

याशिवाय पूरग्रस्त भागातील रस्ते आणि पुलांच्या तात्काळ दुरुस्तीसाठी ‘विशेष रस्ते अनुदान योजने’अंतर्गत अतिरिक्त 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रकमेतून नगरपरिषद हद्दीतील पूल, रस्ते व त्यांच्या काठावरील नाल्यांची दुरुस्ती व बांधकाम करण्यात येणार आहे. आषाढी वारीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारने घेतलेल्या 10 कोटी रुपयांच्या या जलद निर्णयामुळे आळंदीतील पूरग्रस्त नागरिकांना आणि वारकरी भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Tags: alandi newsMaharashtra Floodsocial newsvari news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

paach futacha bachchan
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ कोण?, रंगभूमी गाजवल्यानंतर श्रुती मधुदीपची सिनेमात दमदार एन्ट्री

ऑगस्ट 24, 2026 | 4:48 pm
 Tejaswini Lonari & Samadhan Sarvankar Baby Boy
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, केलं चिमुकल्या बाळाचे स्वागत, कौतुकाचा वर्षाव

ऑगस्ट 22, 2026 | 4:21 pm
Lagnantar Hoyilch Prem Promo
Entertainment

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट! कॉलेजमध्येच नंदिनीने केली काव्याची डिलिव्हरी, प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

ऑगस्ट 20, 2026 | 5:54 pm
Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Next Post
Toxic Tree Effects On Humans

पावसात या झाडाखाली उभं राहणं पडेल महागात, 'ट्री ऑफ डेथ'च सत्य तुम्हाला माहित आहे का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.