अभिनेता सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा धुमधडाक्यात पार पडला. यावेळी अभिनेता सनी देओल याने केलेलं भाष्य सध्या जोरदार चर्चेत आहे. कार्यक्रमादरम्यान सनी देओल म्हणाला की, ‘भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांना एकमेकांसाठी फक्त प्रेम आणि शांतता हवी आहे, परंतु हा राजकीय खेळ आहे जो “द्वेषाला” जन्म देतो.’ (Sunny deol blames)
‘गदर २’ मधल्या कथेविषयी बोलताना सनी देओल म्हणाले की, “ज्यामध्ये तो आपल्या मुलाला परत आणण्यासाठी ‘क्रश इंडिया चळवळ’ च्या मध्यभागी पाकिस्तानला जाणार आहे. सनी देवल पुढे असेही म्हणाले की, “दोन्ही देशातील नागरिकांना “लढाई” करायची नाही. हे सर्व मानवतेवर आधारित आहे. कोणतेही भांडण होऊ नये. दोन्हीकडे समान प्रेम आहे. द्वेषाला जन्म देणारा राजकीय खेळ आहे. या चित्रपटातही तेच पाहायला मिळणार आहे. जनता नहीं चाहती की हम एक दुसरे के साथ झगडे या लढे, आखिर है तो सब इस मिट्टी से (आम्ही एकमेकांशी भांडू नये असे लोकांना वाटते, कारण शेवटी आम्ही एकाच मातीतले आहोत).”
पाहा सनी देवल गदर २ बद्दल बोलताना काय म्हणाला ‘ (Sunny deol blames)
2001 मध्ये रिलीज झालेला ‘गदर: एक प्रेम कथा’ तारा सिंग (देओल) या शीखच्या कथेवर आधारित आहे, जो एका पाकिस्तानी मुस्लिम मुलगी, सकीनाच्या प्रेमात पडतो, सकीनाची ही भूमिका अमीषा पटेलने केली होती. या दोघांनी चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्यांच्या भूमिका पुन्हा केल्या आहेत.
हे देखील वाचा – “मी बहिरी नाही…”, फोटोग्राफर्सवर भडकल्या जया बच्चन, नेटकरी म्हणाले, “हिच्याबरोबर ऐश्वर्या..”
ट्रेलर लॉन्च वेळी सनी देओल असेही म्हणाले की, “प्रेक्षकांच्या प्रेमाने गदरला आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट बनवला आहे आणि ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या सिक्वेलवरही ते असेच प्रेम दाखवतील” अशी आशा आहे.
