शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्याने घेतली महागडी कार, चाहत्यांसह कलाकारांनी केलं कौतुक, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 28, 2025 | 11:06 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Laxshmichya Paulanni serial fame actor Akshar Kothari bought a new expensive car

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अभिनेत्याने घेतली महागडी कार, व्हिडीओ व्हायरल

२०२५ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी नवीन घर, नवीन गाडी व नवीन व्यवसायाची सुरुवात केली. अशातच आता यात आणखी एक अभिनेत्याची भर पडली आहे. ती म्हणजे ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका फेम अक्षर कोठारी. अक्षर कोठारीने नुकतीच नवीन गाडी घेतली असून याची खास झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अक्षरने एक नवी कोरी महागडी गाडी खरेदी केली आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षरने काळ्या रंगाची आलिशान कार खरेदी केली आहे. (Akshar Kothari bought new car)

अक्षरने शोरुमध्येच कारची पूजा केली आणि या नवीन गाडीच्या खरेदीची खास झलक एका व्हिडिओ मार्फत सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या नवीन गाडीनिमित्त अनेक कलाकारांनी अक्षरला शुभेच्छाही दिल्या आहेत. अक्षरन शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेत्री तेजश्री प्रधानने कमेंट करत, “वेलकम टू द फॅमिली, जीप कंपास…गूड चॉइस” असं म्हटलं आहे. तर यशोमान आपटे, अपूर्वा नेमळेकर, ऋतुजा कुलकर्णी, आशुतोष गोखले, सुमित पुसावले, चेतन वडणेरे, किशोरी आंबिये यांसह अनेकांनी त्याला कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Landmark Jeep (@landmark.jeep)

आणखी वाचा – ColdPlay गायक ख्रिस मार्टिन गर्लफ्रेंडसह पोहोचला महाकुंभमध्ये, खांद्यावर घेतली भगवी वस्त्रे, त्रिवेणी संगमात करणार स्नान

सध्या स्टार प्रवाह वरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. या मालिकेतली प्रत्येक पात्र प्रेक्षकांची अगदी आवडती झाली आहेत. मालिकेतील अद्वैत चांदेकर ही भूमिका साकारणारा अभिनेता अक्षर कोठारी हादेखील प्रेक्षकांचा लाडका झाला आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा अक्षर आता त्याच्या नवीन गाडीनिमित्त पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे.

आणखी वाचा – दोन लग्न मोडल्यानंतर राखी सावंतचा तिसऱ्या लग्नाबाबत खुलासा, पाकिस्तानात बांधणार लग्नगाठ, म्हणाली, “आमचं रिसेप्शन…”

अक्षरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अद्वैत चांदेकर भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी त्याने स्टार प्रवाह वरीलच ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेआधी त्याने ‘छोटी मालकीण’, ‘कमला’, ‘चाहूल’ यांसारख्या मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे.

Tags: Akshar Kothari bought new carAkshar Kothari new carLaxshmichya Paulanni fame Akshar Kothari
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Saif Ali Khan Attacked

सैफ अली खानवरील शस्त्रक्रियेनंतर लवकर बरे होण्यावर अनेक प्रश्न उपस्थित, बहीण सबा खानने घेतली भावाची बाजू, म्हणाली, "आधी शिक्षित व्हा आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.