शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचं निधन, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 30, 2024 | 11:27 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Late Actor Farooq Shaikh Wife Roopa Jain Dies

फारुख शेख यांच्या पत्नी रूपा जैन यांचे निधन, पतीच्या निधनानंतर ११ वर्षांनी घेतला जगाचा निरोप

Late Actor Farooq Shaikh Wife Roopa Jain Dies : बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध व दिवंगत अभिनेते फारूख शेख यांच्या पत्नी रूपा जैन यांचं निधन झालं आहे. पतीच्या निधनानंतर तब्बल ११ वर्षांनी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. या जोडप्याच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक असलेल्या शबाना आझमी यांनी रूपा जैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. फारुख शेख यांनी ११ वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतला होता. आता त्यांची पत्नी रूपाही हे जग सोडून गेल्या आहेत. फारुख व रूपाच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक असलेल्या शबाना आझमी यांनी सांगितले की, ही दुःखद बातमी २९ ऑक्टोबरला सकाळी समोर आली.

‘झूम’शी संवाद साधताना शबाना म्हणाल्या, “फारूक व रूपा कॉलेजपासून माझे जवळचे मित्र होते. ते एकमेकांशी किती जोडलेले आहेत हे आम्हा सर्वांना माहीत होते. फारुखच्या आकस्मिक मृत्यूतून रूपा सावरली असेल असे मला वाटत नाही. आपल्या दोन्ही मुलींना सांभाळण्यासाठी ती शक्य ते सर्व प्रयत्न करत राहिली”. आपला जीवनसाथी गमावल्याच्या दुःखाने रुपाला कधीच सोडले नाही, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा – Bigg Boss 18 च्या घरात पार पडला नवीन नॉमिनेशन टास्क, ‘या’ स्पर्धकांना बसला धक्का, नॉमिनेशनची टांगती तलवार कोणावर?

जवळच्या मित्रांचे म्हणणे आहे की, एके दिवशी ती सुद्धा दुसऱ्या जगाच्या प्रवासात आपल्या पतीबरोबर सामील होईल या आशेने तिचा एकटेपणा संपण्याची वाट पाहत होती. फारुख शेख व रूपा जैन यांच्या प्रेमकथेबद्दल सांगायचे तर, मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये रंगभूमीवर सक्रिय असताना दोघेही एकमेकांना भेटले. लग्नापूर्वी ते जवळपास नऊ वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते. फारूक व रूपा या जोडप्याला दोन मुली आहेत आणि त्यांची नावे सना व शाइस्ता अशी आहेत.

आणखी वाचा – परदेशात राहणाऱ्या विशाखा सुभेदार यांच्या लेकाने बनवले लाडू, अभिनेत्रीची कौतुकास्पद पोस्ट, म्हणाल्या, “मी घरी नसूनही…”

फारुख शेख यांचे २८ डिसेंबर २०१३ रोजी दुबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हा अभिनेते ६५ वर्षांचे होते. मुस्लिम कब्रस्तान, चार बंगला, अंधेरी पश्चिम येथे त्यांच्या आईच्या कबरीजवळ त्याचे दफन करण्यात आल्याचे सांगितले जाते.

Tags: bollywood newsfarooq shaikh wife deathLate Actor Farooq Shaikh Wife Roopa Jain Dies
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Navri Mile Hitlerla serial fame Leela Actress Vallari Viraj tells a story about bursting firecrackers as a child.

"माझ्या आईच्या साडीने पेट घेतला अन्...", 'नवरी मिळे...' फेम लीलाने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, "फटाक्यामुळे..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.