सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पूजा-सोहमच्या लग्नातील गंमतीजमतींचा करवलीकडून उलगडा, वेडिंग अनसीन फोटो शेअर करत म्हणाली, “लग्नाची तयारी, संगीतची प्रॅक्टिस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 13, 2025 | 4:32 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Lakshmichya Pavalani fame Sanika Banaraswale

पूजा-सोहमच्या लग्नातील गंमतीजमतींचा करवलीकडून उलगडा, वेडिंग अनसीन फोटो शेअर करत म्हणाली, "लग्नाची तयारी, संगीतची प्रॅक्टिस…"

 Lakshmichya Pavalani fame Sanika Banaraswale : मराठी सिनेसृष्टीतील एका मराठमोळ्या जोडीच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ही कलाकार जोडी म्हणजे अभिनेता सोहम बांदेकर व अभिनेत्री पूजा बिरारी. सोहम व पूजाच्या लग्नात त्यांच्यासह अनेक मराठी कलाकार मंडळींनी जबरदस्त धमाल-मस्ती केलेली पाहायला मिळाली. संबंध मराठी सिनेसृष्टीच पूजा व सोहमच्या लग्नाला होती असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अनेकांनी पूजा व सोहमच्या लग्नानिमित्त खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीने पूजा व सोहमच्या लग्नानंतर खास व्हिडीओद्वारे त्यांच्या लग्नातील धमाल सांगितली आहे.

लक्ष्मीच्या पाउलांनी फेम अभिनेत्री सानिका बनारसवाले हिने सोहम-पूजाच्या लग्नात बरीच धमाल केली. यावेळच्या धमाल-मस्तीबाबत सांगतानाचा व्हिडीओ सानिकाने आता सोशल मीडियावर शेअर केला आहे. यापूर्वीही सानिका पूजा-सोहमच्या लग्नाचे अपडेट सोशल मीडियावर देत होती. आता तिने थेट व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “आमच्या स्पेशल मॅगी टॉक्समध्ये मला कळलेली सोहमबद्दलची गोष्ट, तिथून ते पूजाच्या लग्नाची तयारी, संगीतची प्रॅक्टिस आणि खरोखरचं संगीत पार पडल्यानंतर आम्ही खूप दंगा केला होता. या सगळ्या खूप चांगल्या आठवणी आहेत”.

आणखी वाचा – कलाच्या EXIT नंतर मालिका संपली, ईशा केसकरची पहिली पोस्ट; म्हणाली, “अचानक निरोप घेतल्याबद्दल…”

View this post on Instagram

A post shared by Sanika M Banaraswale (@sanikabanaraswaleofficial)

पुढे ती म्हणाली, “अखेर पुजाला सोहमबरोबर इतकं आनंदी पाहताना आनंदाश्रू तर आलेच होते. पूजाचं छान विधीवत लग्न पार पडलं. किती निरागसपणा होता. आमची गोंडस पूजा सौभाग्यवती झाली. एकेक असे सगळे विधी पार पडले आणि त्यानंतर पूजाने सुंदर उखाणा घेतला. या नवदांपत्यासाठी खूप आनंदी आहे”.

आणखी वाचा – मालिकाविश्वातील आणखी एक चेहरा अडकला लग्नबंधनात, झाला डोंबिवलीचा जावई, फोटो समोर

सानिका असेही म्हणाली, “एवढ्या महिन्यांपासून सुरु असलेली तयारी, पळापळ आज इथे थांबली. सगळी मजा झाल्यानंतर आम्ही पूजाची पाठवणी करुनच घरी परतलो”, असे म्हणत पूजाच्या लग्नातील गमतीजमती सांगितल्या आहेत. सानिकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पूजा-सोहमच्या लग्नातील काही अनसीन सीन पाहायला मिळत आहेत.

Tags: Lakshmichya Pavalanisaham and pooja weddingSanika Banaraswale
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
 Office Work Exercises

दिवसभर कॉम्प्युटर, लॅपटॉपसमोर बसून त्रास होतोय का?, ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांसाठी फिजिओथेरपिस्टकडून 'या' आहेत सोप्या टिप्स, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.