Krushna Abhishek Sister Somya Seth pregnant : गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंग गरोदर असल्याच्या चर्चा होत्या पण या चर्चांना अल्पावधीतच पूर्णविराम मिळाला. यानंतर आता त्यांच्या कुटुंबातून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आरती नाहीतर सौम्या सेठ लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज समोर आली आहे. तिने ही गोड बातमी चाहत्यांसह इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे शेअर केली आहे. विनय आनंद आणि रागिनी खन्ना यांच्या बहिणीचा संसार आता मोठा होत जाणार आहे आणि तिच्या दुसर्या लग्नातील हे पहिले मूल असेल. या बातमीने सौम्या आणि तिच्या कुटुंबीयांचाही आनंद गगनात मावेनासा होत आहे.
सौम्या सेठने २०१७ मध्ये व्यावसायिक अरुण कपूरशी लग्न केले आणि काही महिन्यांनंतर तिने मुलगा इडनच्या आगमनाची माहिती दिली आणि आई झाली असल्याचं सांगितलं. पण दोन वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. अभिनेत्रीने पहिल्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला.’नव्या… नई धड़कन नए सवाल’ आणि ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ सारख्या कार्यक्रमांसह घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री आता अमेरिकेत स्थायिक झाली आहे. अभिनयविश्वाला तिने रामराम करत अमेरिका गाठलं.
आणखी वाचा – महिला चाहतीवर रागावल्या जया बच्चन, हातही झिडकारला अन्…; नेटकऱ्यांना खटकलं, म्हणाले, “हिला सहन…”
सौम्य सेठने २२ जून २०२३ रोजी प्रियकर शुभम चुहादियाशी लग्न केले. तो तिचा रुममेट होता. फॅशन डिझायनर शुभम यांनी अभिनेत्री सौम्या हिच्या पहिल्या मुलाला दत्तक घेतलं होतं पण आता त्यांना त्यांचंही कुटुंब मोठं करायचं होतं. अभिनेत्रीने चाहत्यांना एका व्हिडीओद्वारे ही आनंदाची बातमी दिली. तिने सांगितले की, आम्ही आता चौघं होणार आहोत. अभिनेत्रीच्या या बातमीने विक्रांत मैसी, किश्वर मर्चेंट यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा देत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा – जॅकलिन फर्नांडिसच्या आईच्या निधनाने वडिलांची वाईट अवस्था, रडत असताना डगमगले अन्…; पत्नीच्या आठवणीत भावुक
सौम्या सेठने अभिनय विश्वापासून दूर जात व्यावसायिक क्षेत्रात जम बसवला आहे. ती रिअल इस्टेट एजंटचे काम पाहतेय. अभिनेत्रीचे वडील आणि आजोबा व्यावसायिक होते. त्यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्रीने या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. ती वर्जीनियामध्ये व्यवसाय करीत आहे. मुलगा आणि पतीबरोबर आयुष्याचा आनंद घेत त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सौम्या तिच्या आयुष्याशी संबंधित नेहमीच अपडेट देते.