सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेकच्या बहिणीने दिली गुडन्यूज, लवकरच होणार आई, सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 7, 2025 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Krushna Abhishek Sister Somya Seth pregnant

गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेकच्या बहिणीने दिली गुडन्यूज, लवकरच होणार आई

Krushna Abhishek Sister Somya Seth pregnant : गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंग गरोदर असल्याच्या चर्चा होत्या पण या चर्चांना अल्पावधीतच पूर्णविराम मिळाला. यानंतर आता त्यांच्या कुटुंबातून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आरती नाहीतर सौम्या सेठ लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज समोर आली आहे. तिने ही गोड बातमी चाहत्यांसह इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे शेअर केली आहे. विनय आनंद आणि रागिनी खन्ना यांच्या बहिणीचा संसार आता मोठा होत जाणार आहे आणि तिच्या दुसर्‍या लग्नातील हे पहिले मूल असेल. या बातमीने सौम्या आणि तिच्या कुटुंबीयांचाही आनंद गगनात मावेनासा होत आहे.

सौम्या सेठने २०१७ मध्ये व्यावसायिक अरुण कपूरशी लग्न केले आणि काही महिन्यांनंतर तिने मुलगा इडनच्या आगमनाची माहिती दिली आणि आई झाली असल्याचं सांगितलं. पण दोन वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. अभिनेत्रीने पहिल्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला.’नव्या… नई धड़कन नए सवाल’ आणि ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ सारख्या कार्यक्रमांसह घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री आता अमेरिकेत स्थायिक झाली आहे. अभिनयविश्वाला तिने रामराम करत अमेरिका गाठलं.

आणखी वाचा – महिला चाहतीवर रागावल्या जया बच्चन, हातही झिडकारला अन्…; नेटकऱ्यांना खटकलं, म्हणाले, “हिला सहन…”

View this post on Instagram

A post shared by Somya Seth | VA & MD Realtor (@somyaseth)

सौम्य सेठने २२ जून २०२३ रोजी प्रियकर शुभम चुहादियाशी लग्न केले. तो तिचा रुममेट होता. फॅशन डिझायनर शुभम यांनी अभिनेत्री सौम्या हिच्या पहिल्या मुलाला दत्तक घेतलं होतं पण आता त्यांना त्यांचंही कुटुंब मोठं करायचं होतं. अभिनेत्रीने चाहत्यांना एका व्हिडीओद्वारे ही आनंदाची बातमी दिली. तिने सांगितले की, आम्ही आता चौघं होणार आहोत. अभिनेत्रीच्या या बातमीने विक्रांत मैसी, किश्वर मर्चेंट यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा देत प्रेमाचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – जॅकलिन फर्नांडिसच्या आईच्या निधनाने वडिलांची वाईट अवस्था, रडत असताना डगमगले अन्…; पत्नीच्या आठवणीत भावुक

सौम्या सेठने अभिनय विश्वापासून दूर जात व्यावसायिक क्षेत्रात जम बसवला आहे. ती रिअल इस्टेट एजंटचे काम पाहतेय. अभिनेत्रीचे वडील आणि आजोबा व्यावसायिक होते. त्यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्रीने या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. ती वर्जीनियामध्ये व्यवसाय करीत आहे. मुलगा आणि पतीबरोबर आयुष्याचा आनंद घेत त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सौम्या तिच्या आयुष्याशी संबंधित नेहमीच अपडेट देते.

Tags: entertainemnt newsKrushna Abhishek Sister Somya Seth pregnantSomya Seth pregnant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Jay Bhim Panther - Ek Sangharsh

'जयभीम पँथर' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, गौरव मोरेच्या भूमिकेची कमाल, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.