रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘जयभीम पँथर’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, गौरव मोरेच्या भूमिकेची कमाल, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 7, 2025 | 12:50 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jay Bhim Panther - Ek Sangharsh

'जयभीम पँथर' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, गौरव मोरेच्या भूमिकेची कमाल, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Jay Bhim Panther – Ek Sangharsh : दलित, शोषित बहुजन समाजातील घटकांवर अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या प्रत्येक बहुजन संघटनेची, आणि त्यांच्या संघर्षाची सर्वसमावेशक कहाणी ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ हा चित्रपट मांडणार आहे. जातींमधील संघर्ष, दलितांमधील अत्याचार, बहुजन राजकारण, शिक्षण याचं चित्रण करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक महत्त्व हा चित्रपट अधोरेखित करतोय. आजच्या काळात राजकारण बदलत असताना आणि जातीय संघर्ष वाढत असताना एक वेगळा सर्वसमावेशक विचार देण्याचा प्रयत्न ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ हा चित्रपट करत असल्याचं ट्रेलरवरुन दिसत आहे.

अनुभवी अभिनेत्यांचा अभिनय, कसदार लेखन दिग्दर्शनांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणेल यात शंका नाही. दलित, जातीभेद या विषयीच्या संघर्षाची दमदार कथा ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला आणि त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – जॅकलिन फर्नांडिसच्या आईच्या निधनाने वडिलांची वाईट अवस्था, रडत असताना डगमगले अन्…; पत्नीच्या आठवणीत भावुक

भदंत शीलबोधी थेरो यांच्या ‘नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन’द्वारे निर्मिती होत असलेला ‘जयभीम पँथर’ एक संघर्ष हा महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आयु. रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा या निर्मिती संस्थेचा मानस आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे. प्रोजेक्ट हेड म्हणून संतोष गाडे, कार्यकारी निर्माता बाबासाहेब पाटील आणि कलादिग्दर्शक म्हणून प्रकाश सिंगारे यांनी काम पाहिले आहे.

आणखी वाचा – महिला चाहतीवर रागावल्या जया बच्चन, हातही झिडकारला अन्…; नेटकऱ्यांना खटकलं, म्हणाले, “हिला सहन…”

‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ चित्रपटात अभिनेता गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, मिलिंद शिंदे, अभिजीत चव्हाण, सोनाली पाटील, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, संजय कुलकर्णी, प्रवीण डाळिंबकर, विनय धाकडे, प्रियांका उबाळे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी ‘माझ्या भीमाची जयंती’ हे दमदार आवाजात गाणे गायले असून ते सध्या ट्रेंडिंगवर आहे. चित्रपटाचे संगीत, पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांचे असून ज्याचे लेखन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे. चित्रपटाच्या दमदार ट्रेलरमुळे आता ११ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहावी लागणार आहे.

Tags: Jay Bhim Panther - Ek SangharshJay Bhim Panther - Ek Sangharsh marathi moviemarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Marathi tv serial actress sheetal kshirsagar

“अनुभवी कलाकारांकडून त्रास, पाय खेचण्याचा प्रयत्न आणि...”, शितल क्षीरसागरचा खुलासा, वाईट अनुभवांमुळे...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.