रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध कलाकारांनी त्यांच्या तरुण मुलांना गमावलं, अजूनही ते दुःख पचवू शकले नाहीत, दुर्देव असं की…

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 7, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Krishna Kumar, Shekhar Suman, Anuradha Paudwal and Prakash Raj and many celebs lost their young children

कृष्ण कुमार, शेखर सुमन, अनुराधा पौडवाल व प्रकाश राज यांसारख्या अनेक कलाकारांनी मुला-मुलींना गमावले, जाणून घ्या...

मुलांसाठी आई-वडील सर्व काही करतात. त्यांना जन्म देण्यापासून, त्यांचे शाळेत पहिले पाऊल टाकण्यापासून ते आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहीपर्यंत सर्वकाही करतात. कधी मुलांचे पोटं भरण्यासाठी आई स्वत:च्या वाटणीची चपातीही लेकराला देते तर वडील मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी स्वत:साठी नवीन वस्तू खरेदी करत नाही. आईवडील मुलांसाठी भरपूर कष्ट करतात. मुलांसाठी इतके कष्ट करुन जेव्हा आयुष्याच्या एका वळणावर मुलं पालकांना कायमचे सोडून जातात अशा आई-वडिलांचे दु:ख तेच जाणो. मनोरंजन विश्वातील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांची मुलं सोडून गेली.

चित्रपट निर्माते कृष्ण कुमार यांनी नुकतीच त्यांची २१ वर्षांची मुलगी तिशा कुमार गमावली होती. कर्करोगाशी लढा देत असताना १८ जुलै रोजी तिशाचा मृत्यू झाला. आपल्या तरुण मुलीच्या मृत्यूनंतर कृष्ण कुमार पूर्णपणे खचून गेले. आपल्या मुलीच्या मृत्यूवेळी कृष्ण कुमार यांची अवस्था कोणत्याही बापाला न पाहवणारी होती.

विनोदी अभिनेते शेखर सुमन यांनी अनेकदा आपल्या कॉमेडीने लोकांना हसवलं आहे. पण अभिनेत्याच्या हास्यामागे त्याच्या मुलाच्या निधनाचे कौतुक आहे. अभिनेता शेखरलाही त्याच्या १२ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूचे दुःख झाले आहे. आपल्या मुलाच्या निधनाचा क्षण आठवून शेखर अजूनही थरथर कापतो. मुलाच्या निधनाचे दु:ख आजही अभिनेत्याच्या मनात आहे.

आपल्या सुमधुर आवाजाने लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचे आयुष्यही अनेक वेदनांनी भरलेले आहे. त्यांनी आपला नवरा गमावला आणि त्यानंतर त्यांच्या मुलानेही या जगाचा निरोप घेतला. अनुराधा पौडवाल यांच्या ३५ वर्षांच्या मुलाने कोविडच्या काळात या जगाचा निरोप घेतला. त्यांचा मुलगा किडनीच्या आजाराने त्रस्त होता.

अभिनेते कबीर बेदी यांना त्यांच्या मुलांच्या अकस्मित निधनाचे दु:ख होते. आयुष्यात चार वेळा लग्न थाटणारे कबीर बिनधास्तपणे आयुष्य जगण्यासाठी ओळखले जातात, पण त्यांच्याही आयुष्यात एक खोल जखम आहे. हे दुःख म्हणजे त्यांनी त्यांच्या तरुण मुलाला कायमचे गमावले आहे. त्यांचा मुलगा सिद्धार्थने वयाच्या २६ व्या वर्षी आत्महत्या केली होती.  

आणखी वाचा – “स्त्रीत्व उत्तेजित पद्धतीने दाखवण्याला विरोध अन्…”, नीना कुळकर्णींनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाल्या, “थोबाडीत देईन…”

बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते प्रकाश राज आपल्या मुलाच्या निधनाच्या दु:खात आहेत. २००४ मध्ये त्यांच्या पाच वर्षांच्या मुलगा सिद्धूचं दुर्दैवी निधन झालं. त्यावेळी ते ललिता कुमारी यांच्याशी विवाहित होते. मुलाच्या निधनाने त्यांना मोठा धक्का बसला, अंत्यसंस्काराच्या वेळीचा प्रसंग त्यांचासाठी खूपच कठीण होता. या घटनेमुळे त्यांच्या जीवनाबद्दलच्या दृष्टिकोनात खोलवर बदल झाला.

आणखी वाचा – अखेर प्रतिक्षा संपली! ‘आठवी अ’च्या भरघोस यशानंतर ‘दहावी अ’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मुहूर्त सोहळा संपन्न, उत्सुकता शिगेला

हिंदी चित्रपटांतली प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी यांनाही आपल्या तरुण मुलीला गमवावं लागलं होतं. पायल या आपल्या मुलीच्या निधनाने अभिनेत्री अनेक काळ दु:खात होत्या. पायलला मधुमेह झाला आणि ती ३० महिने कोमात होती. २०१९ मध्ये तिचे निधन झाले होते.   

Tags: Anuradha Paudwal Son Passes AwayKrishna Kumar Daughter Passes AwayPrakash Raj Son Passes AwayShekhar Suman Son Passes Away
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Arjun Kapoor On Disease

गंभीर आजाराशी सामना करत आहे अर्जुन कपूर, पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाला, "याबाबत कधीच बोललो नाही पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.