रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आता कुठे आहे ‘बागबान’चा छोटा राहुल?, २१ वर्षांनंतर दिसतो असा, अभिनयक्षेत्र सोडून आता जगतो असं आयुष्य

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 8, 2024 | 5:51 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Baghban Movie Child Actor

आता कुठे आहे 'बागबान'चा छोटा राहुल?, २१ वर्षांनंतर दिसतो असा, अभिनयक्षेत्र सोडून आता जगतो असं आयुष्य

अभिनेते अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, समीर सोनी, सलमान खान, महिमा चौधरी, दिव्या दत्ता, रिमी सेन आणि इतर कलाकारांच्या भूमिका असलेला ‘बागबान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून लावली होती. या चित्रपटात एक लहान मुलगा होता, ज्याचे नाव राहुल असे होते. त्याने अमिताभ बच्चनच्या नातवाची भूमिका केली होती. आज हा राहुल खऱ्या आयुष्यात काय करतो याबाबत आपण जाणून घेणार आहोत. (Baghban Movie Child Actor)

२००३ मध्ये, रवी चोप्रा दिग्दर्शित आणि बीआर चोप्रा आणि इतरांनी लिहिलेला ‘बागबान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. १० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली. या चित्रपटाने तब्बल ४३ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. आजही या चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. अमिताभ बच्चन यांचा चष्मा चपलांच्या पैशातून दुरुस्त करणारा तो छोटा राहुलही सर्वांना आठवत असेल. आता हा राहुल मोठा झाला असून तो काय काम करतो याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा – उन्हाळयाच्या सुट्टीसाठी अलिबागला पोहोचले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सुप्रसिद्ध कलाकार, गावामध्ये राहिले अन्…; फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Yash Pathak (@yashpathak06)

अमिताभ बच्चन व हेमा मालिनी यांच्या नातवाच्या भूमिकेत दिसणारा राहुल मल्होत्रा ​​उर्फ ​​यश पाठक या चित्रपटामुळे साऱ्यांच्या पसंतीस उतरला होता. प्रेक्षकांनीही त्यांच्या या भूमिकेवर भरभरुन प्रेम केले. राहुल अर्थात यश पाठकने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. यामध्ये ‘गंगाजल’, ‘राहुल’, ‘पर्वण’ या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. यश पाठक हा आता अभिनेता नाही. लहानपणी अनेक चित्रपटांमधुन महत्त्वपूर्ण भूमिका केल्यानंतर यशने मोठे झाल्यानंतर अभिनय सोडून स्वतःचे एक विश्व निर्माण केले.

आणखी वाचा – Video : इतकी मोठी झाली आहे अनुष्का शर्मा व विराट कोहलीची लेक, दुसऱ्या बाळानंतर पहिल्यांदाच समोर आला व्हिडीओ, रंगली चर्चा

View this post on Instagram

A post shared by Yash Pathak (@yashpathak06)

आज यश पाठक संगीतकार व संगीत निर्माता म्हणून सिनेसृष्टीत काम करत आहे. सोशल मीडियावर यश बऱ्यापैकी सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या गाण्यांचे अपडेट्स तो देत असतो. यश पाठक याने एआर रहमानबरोबर कोक स्टुडिओमध्ये काम केले आहे. त्याने स्वतः रील शेअर करुन याबाबत माहिती दिली. यश पाठक यांचे स्वतःचे युट्युब चॅनल आहे. युट्युब चॅनेलद्वारे तो नेहमीच आपली गाणी प्रेक्षकांसह शेअर करत असतो.

Tags: baghban movieBaghban Movie Child Actorentertainmentyash pathak
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Amit Bhanushali bts Video

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; 'ठरलं तर मग'च्या कलाकारांचं सेटवरचं आयुष्य कसं?, अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.