सिनेमाविश्वात असे काही कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या दर्जेदार भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. यांत एक नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे अभिनेत्री किशोरी शहाणे. पन्नाशी ओलांडली तरी फिटनेसच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असणारी अभिनेत्री म्हणून किशोरी शहाणेच नाव घेणं चुकीचं ठरणार नाही. नव्वदीच्या काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. (Kishori shahane movie)
इतकंच नव्हे तर मराठी, बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही किशोरी शहाणे यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप पाडली. अभिनयासोबतचं त्या उत्कृष्ट नृत्यांगणा म्हणूनही लोकप्रिय आहेत. किशोरी शहाणे यांच्या हातून एक सिनेमा गेला होता आणि आजही त्याची खंत त्यांना आहे, तो सिनेमा नेमका कोणता होता आणि तो का त्यांच्या हातून गेला याबद्दल जाणून घेऊया आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात.
पाहा का नाकारला होता किशोरी शहाणे यांनी चित्रपट (Kishori shahane movie)

सचिन पिळगावकर दिग्दर्शित १९८८ साली आलेला ‘अशी ही बनवाबनवी’ या सुपरहिट चित्रपटाचा हा किस्सा आहे. या चित्रपटात खरं तर किशोरी शहाणे भूमिका साकारणार होत्या, मात्र काही कारणास्तव त्यांच्या हातून हा सिनेमा गेला. याबाबत किशोरी शहाणे यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “त्यांनी जेव्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा त्या वयाने लहान होत्या आणि ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटासाठी त्यांना त्याचवेळी विचारण्यात आलं होत.
ज्यावेळी त्यांना चित्रपटातल्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा त्या कॉलेजमध्ये होत्या आणि त्याचवेळी त्यांची परीक्षाही सुरु होती. अभ्यासाचं वर्ष वाया जाऊ नये, म्हणून ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट किशोरी यांच्या हातून गेला.”
जर किशोरी शहाणे यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटात काम केलं असतं तर त्यांच्या अपोसिट तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.