अभिनेते केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. चित्रपटातील कलाकार मंडळी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीपा परब, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर या कलाकारांना पाहणं रंजक ठरणार आहे. मल्टीस्टारर अशा या चित्रपटात बाईचे अनेक पदर उलगडताना दिसणार आहेत. अशातच दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(Kedar Shindes Special Post)
केदार शिंदे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्री सुकन्या मोने यांच्याबद्दल भरभरून लिहिलं आहे. सुकन्या मोने यांच्या सोबतचा एक कँडिड फोटो पोस्ट करत केदारने लिहिलं आहे की, काही लोकं जन्माला येतात ती परोपकार करण्यासाठी! स्वतः आधी दुसऱ्याचा विचार! ताटातलं अन्न सुध्दा आधी दुसऱ्याला भरवतील. #बाईपणभारीदेवा मधली, मधली बहिण साधना आणि Sukkutai यांच्यात कणाचाही फरक नाही. मी सातवीत असताना “झुलवा”नाटक पाहिलं तेव्हापासून मी तीचा फॅन.
पाहा केदार शिंदेची सुकन्या मोने यांच्यासाठी खास पोस्ट (Kedar Shindes Special Post)
पुढे तीने जे जे काम केलं त्याचा प्रेक्षक! पण एकत्र काम करण्याचा योग या सिनेमाच्या निमित्ताने आला. कॅरेक्टर मध्ये तीला तीचं सगळं ठरवायचं असतं आणि करायचही असतं. आपण फक्त हवं नको तेवढच सांगायचं. माझी तीची घट्ट मैत्री झाली ती जुलियाच्या निमित्ताने. शिवाजीपार्क नाक्यावर ती आणि मोने काका जुलियाला घेऊन यायचे आणि ती छोटी जुलिया आमच्या कडेवर बसून जीप्सी मधले मासे पाहायची. तीच जुलिया आता परदेशात शिक्षणासाठी गेली आहे. पण तीचं सिनेमातलं पदार्पण याच सिनेमाच्या निमित्ताने आहे.(Kedar Shindes Special Post)
हे देखील वाचा – घराच्या दरवाज्यावर चित्र चिमुकलीची शिवालीला खास भेट
Sukkutaiला एवढंच सांगणं आहे की, अशीच राहा.. कारण अशी लोकं आता देव बनवायला विसरला आहे. केदारने केलेल्या या पोस्टवर सुकन्या मोने यांनी कमेंट केली आहे. ‘आई ग…. केवढ मोठ्ठं केलंस रे मला….तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळेच मी अजून अजून चांगली काम करतेय….तग धरून आहे…खूप खूप प्रेम तुला आणि आपल्या संपूर्ण समूहाला’ असं म्हणत सुकन्या यांची ही या पोस्ट वरील कमेंट लक्षवेधी ठरतेय.
