छोट्या पडद्यावरील मनोरंजनाबरोबर माहितीचा स्त्रोत म्हणून ओळखला जाणारा कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतात. हा कार्यक्रम सुरुवातीपासूनच बराच चर्चेत आहे. नुकतीच १४ ऑगस्टला या कार्यक्रमाच्या १५ व्या पर्वाची सुरूवात झाली आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. आजपर्यंत अनेक जणांनी हॉट सीटवर बसण्याचं स्वप्न पाहिलं. पण त्यातील काही जणांचच हे स्वप्न पूर्ण झालं आहे. लवकरच केबीसीला या पर्वाचा पहिला करोडपती मिळणार आहे. नुकतीच केबीसीच्या प्रोमोने ही बातमी जाहीर केली आहे. (The first crorepati of kbc 15)
‘केबीसी’च्या १५ व्या पर्वाची नुकतीच जोरदार सुरुवात झाली. विशेष म्हणजे या पर्वात फक्त १ कोटी रुपयांसाठीचे प्रश्न नसून आता केबीसीमध्ये ७ कोटी रुपयांपर्यंतचे प्रश्न समाविष्ट केले आहेत. आताच आलेल्या प्रोमोमध्ये एक स्पर्धक करोडपती बनला आहे. त्याने १ करोड रुपये जिंकत १६ व्या प्रश्नापर्यंत मजल मारली आहे. या प्रोमोत असं दिसत आहे की, सध्या हॉटसीटवर पंजाबचा २१ वर्षीय जसकरण सिंग हा युवक विराजमान आहे. होस्ट अमिताभ बच्चन यांनी जाहीर केलं, जे ऐकून तो हॉटसीटवरून उठून उभा राहतो.
वाचा – जाणून घ्या या पर्वाच्या पहिल्या करोडपतीबद्दल?(The first crorepati of kbc 15)
नेमका कोण आहे जसकरण? तर जसकरण सिंग हा पंजाबमधील खाल्रा या लहान खेडेगावातला युवक आहे. तो सध्या पदवीचं शिक्षण घेतो. त्याच्या गावापासून त्याला कॉलेजला जाण्यासाठी ४ तास लागतात. त्याच्या गावातील पदवीचं शिक्षण घेतलेल्या मोजक्या लोकांपैकी तो एक आहे. तो सीव्हील सर्व्हिसचीही तयारी करत आहे. आगामी वर्षात तो आयइएसचा पहिला प्रयत्न करणार आहे.
आणखी वाचा – छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार विकी कौशल?, चित्रपटाच्या तयारीला सुरुवात
सोनी टीव्हीने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. यानंतर एक दुसरा व्हिडीओही व्हायरल होत आहे. ज्यात अमिताभ यांनी शोमध्ये अनेकांना करोडपती होताना पाहिलं आहे. पण ७ करोड रुपयांचा प्रश्न समोर आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव तसेच स्पर्धकांसह प्रेक्षकांनीही श्वास रोखून धरलेला दिसत आहे. या अगोदरही स्पर्धकांनी पारितोषिक मिळवली आहेत पण ७ करोड रुपयांपर्यंत पोहोचणारा हा पहिलाच स्पर्धक ठरला आहे. स्पर्धक राहुल कुमार नेमा हा १ कोटी रुपयांची पातळी गाठणारा पहिला स्पर्धक ठरला होता. मात्र, त्याने जोखीम घेणं टाळलं व ५० लाख रुपयांवर समाधान मानलं.