शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘हे’ लोकप्रिय चित्रपट आता ओटीटीवरही प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 15, 2024 | 12:32 pm
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
Salaar the kerala story dunki ott release this week on 16th February 2024 see the details

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘हे’ लोकप्रिय चित्रपट आता ओटीटीवरही प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?

ओटीटी वापरकर्त्यांसाठी येता आठवडा खास असणार आहे. १६ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर हे चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात ओटीटी वापरकर्त्यांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. चला तर जाणून घेऊयात येत्या आठवड्यात प्रदर्शित होणारे हे लोकप्रिय चित्रपट कोणते?

सालार : प्रभासची मुख्य भूमिका असलेला ‘सालार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘सालार’ने भारतात ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित झाला, मात्र चित्रपटाची हिंदी आवृत्ती अद्याप प्रदर्शित झालेली नव्हती. त्यामुळे अनेक चाहते साला’च्या हिंदी आवृत्तीची वाट पाहत होते. दरम्यान, १६ फेब्रुवारीपासून सालार हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी माध्यमावर ‘सालार’ हिंदी प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

आणखी वाचा – प्रथमेश परबनंतर सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांसचा साखरपुडा सोहळा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

द केरला स्टोरी : अदा शर्माची मुख्य भूमिका असलेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले होते आणि आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट १६ फेब्रुवारीपासून झी-५ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अदा शर्माने सोशल मीडियावर यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. “बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द केरला स्टोरी’ १६ फेब्रुवारीपासून झी-५वर प्रदर्शित होणार आहे” असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

आणखी वाचा – कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आईचे निधन, ‘इंडियन आयडल’मध्ये लेकाचं झालेलं कौतुक पाहून ढसाढसा रडल्या होत्या अन्…

डंकी : शाहरुख खानच्या ‘पठाण’ व ‘जवान’ या चित्रपटांनी चित्रपटगृहांत बक्कळ कमाई केली होती. २०२३च्या शेवटी म्हणजेच डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डिंकी’नेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहता आला नव्हता, ते आता ओटीटीवर हा चित्रपट येण्याची वाट पाहत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ‘डिंकी’ चित्रपट १६ फेब्रुवारीपासून ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. जिओ सिनेमा या ओटीटी माध्यमावर चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Tags: Dunkyentertainment newsott entertainment newsOTT Exhibitionott newssalaarthe kerala storyओटीटी प्रदर्शनओटीटी बातमीडंकीद केरला स्टोरीमनोरंजन बातमीसालार
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Engagement

ना शाही थाट, ना अवाढव्य खर्च; प्रथमेश परबच्या साखरपुड्यातील साधेपणाने वेधलं लक्ष, कुटुंबही भारावलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.