Captain Vikram Batra Mother Passes Away : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका असलेला ‘शेरशाह’ चित्रपट तुम्हा सर्वांना आठवतच असेल. २०२१ मध्ये आलेल्या ‘शेरशाह’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट कारगिल युद्ध (१९९९) परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने शहीद विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती. त्याच परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आईचे निधन झाले आहे.
कमलकांत बत्रा या ७७ वर्षांच्या होत्या. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले असल्याचे वृत्त येत आहे. तसेच कमलकांत बत्रा या काही दिवसांपासून आजारीसुद्धा होत्या. दरम्यान काल (१४ फेब्रुवारी) रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले.
आणखी वाचा – प्रथमेश परबनंतर सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांसचा साखरपुडा सोहळा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
‘शेरशाह’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कॅप्टन विक्रम बत्राचे वडील जीएल बत्रा आणि त्यांची आई यांनी ‘इंडियन आयडॉल’ या गाण्याच्या शोमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्या आपल्या शहीद मुलासाठी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी “मला अभिमान आहे की, मी अशा मुलाला जन्म दिला ज्याने त्याचे आयुष्य या देशाला समर्पित केले”
शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आईच्या निधनावर सर्वांनी शोक व्यक्त केला असून अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजलीही वाहिली आहे. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवार (१५ फेब्रुवारी) रोजी पालमपूर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त मिळत आहे.