शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक, वयाच्या ८६ व्या घेतला अखेरचा श्वास, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 20, 2024 | 4:30 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Kiccha Sudeep Mother Passed Away

कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपची आई सरोजा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

Kiccha Sudeep Mother Passed Away : कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपची आईचे २० ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सरोजा संजीव असं त्याच्या आईचं नाव असून आईच्या निधनामुळे अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किच्चाची आई सरोजा गेल्या अनेक वर्षांपासून आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज सरोजा संजीव यांनी अखेरचा श्वास घेतला. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २० ऑक्टोबरला किच्चाच्या आईने अखेरचा श्वास घेतला. बंगळुरु येथील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. (Kiccha Sudeep Mother Passed Away)

आईच्या निधनामुळे किच्चा आणि त्याचं संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सरोजा शारीरिक व्याधींनी ग्रस्त होत्या. त्या कायम डॉक्टरांच्या देखरेखीखाली असायच्या. किच्चाच्या आईच्या निधनाने अभिनेत्याचे अनेक चाहते सोशल मीडियावर त्याच्या आईला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. सुदीप तीन मुलांपैकी सर्वात लहान असून त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत. या अभिनेत्यासाठी, चित्रपटसृष्टी आणि त्याचे चाहते त्याच्या आईच्या निधनाने शोक करत आहेत. त्यांचे सांत्वन केले.

ತೊಟ್ಟಿಲು ತೂಗೋಳಿಗೆ ಚಟ್ಟವ ಕಟ್ಟೋದೆಗೆ 🥺💔
Om Shanti! 💐

Stay strong Bossuu @KicchaSudeep #RipSarojaAmma pic.twitter.com/q1ICTqK0Fl

— 𝗔 𝗥 𝗧 𝗜 𝗦 𝗧♪ (@MahiTweetxx) October 20, 2024

आणखी वाचा – कचरा प्रकरणी पुन्हा एकदा भडकला शशांक केतकर, व्हिडीओद्वारे दाखवली सत्य परिस्थिती, म्हणाला, “इतका निर्लज्जपणा…”

किच्चा सुदीपच्या आईचं पार्थिव आज बंगळुरु येथील जेपी नगरमध्ये अभिनेत्याच्या घरी अंतिम दर्शनासाठी आणलं जाईल. किच्चाचे जवळते मित्र, नातेवाईक आणि मनोरंजन विश्वातील कलाकार किच्चाच्या आईचं अंतिम दर्शन घेतील. पुढे संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सरोजा संजीव यांच्यावर विल्सन गार्डन येथे अंतिम संस्कार केले जातील. किच्चा व त्याच्या कुटुंबासाठी हा दुःखद प्रसंग असून सर्वजण त्याला धीर देत आहेत.

आणखी वाचा – मुलगी झाली हो! ‘बिग बॉस’ फेम युविका व प्रिन्स यांच्या घरी चिमुकलीचे आगमन, लग्नाच्या सहा वर्षांनी झाले आई-बाबा

दरम्यान, किच्चा सुदीपच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या ‘बिग बॉस कन्नड’ होस्ट करत आहे. २०२२ मध्ये विक्रांत रोना नंतरचा त्याचा पुढचा चित्रपट, ॲक्शन थ्रिलर मॅक्सच्या प्रदर्शनाची देखील वाट पाहत आहे. याआधी तो ‘मख्खी’ चित्रपटातून चांगलाच लोकप्रिय झाला होता. ज्यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री समंथादेखील होती.

Tags: Kiccha SudeepKiccha Sudeep MotherKiccha Sudeep Mother Death News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss 18 fame Hema Sharma accused by her ex-husband of demanding the house and not allowing him to see his son

घर बळकाण्याचा प्रयत्न, लहान मुलाला भेटू देत नाही अन्...; Bigg Boss 18 फेम हेमा शर्मावर माजी पतीचे गंभीर आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.