शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कल्याण येथील हॉस्पिटलमधील मराठी तरुणीला अमानुष मारहाण, ‘त्या’ व्हिडीओची जोरदार चर्चा, नक्की चूक कोणाची?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 23, 2025 | 6:31 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kalyan woman assault

कल्याण येथील हॉस्पिटलमधील मराठी तरुणीला अमानुष मारहाण, 'त्या' व्हिडीओची जोरदार चर्चा, नक्की चूक कोणाची?

Kalyan woman assault : सध्या सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे ती म्हणजे कल्याण येथे अमराठी माणसाकडून मराठी मुलीला केलेली मारहाण. हो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहताच पायाखालची जमीनच सरकली. त्या बलाढ्य तरुणाने येत थेट त्या काटकुट्या मुलीच्या छाताड्यात लाथ मारली. बघून अंगात शिरशिरी आली. त्यांनतर मराठी माणसाचा असा अमराठी माणसाकडून अपमान, मारहाण झालेली पाहताच मनसे पक्षाने पुढाकार घेत थेट आवाज उठविला. एका रुग्णालयात रिसेप्शनिस्टचं काम करणाऱ्या मराठी तरुणीला गोकुळ झा या इसमाने मारहाण केली. यावेळी अनेक मराठी माणसं एकत्र येथ आवाज उठविताना दिसले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर हे प्रकरण चांगलंच चिघळलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अखेर मनसे पदाधिकाऱ्यांनीच गोकुळला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केलं. सध्या हे प्रकरण कोर्टाची पायरी चढलं आहे. अशातच या प्रकरणासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला आणि नक्की चूक कोणाची असा सवाल मनात भेडसावू लागला. हो. त्या व्हिडीओची दुसरी बाजू सर्वांसमोर आली असली तरी व्हिडीओची पहिली बाजू काय हा विचार अर्थात सतावत होता. आणि अशातच त्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ती तरुणी एका विचारपूस करायला आलेल्या महिलेच्या अंगावर धावून जात तिला मारताना दिसली.

आणखी वाचा – “माझा निर्णय चुकला म्हणून…”, घटस्फोटावर शर्मिष्ठा राऊत स्पष्टचं बोलली, म्हणाली, “वैष्णवी हगवणेसारखं…”

आणि त्या महिलेच्या नातलगानेच रागारागात येत त्या मुलीला मारहाण केली. एखाद्या परस्त्रीला मारहाण करणं चूक आहेच यांत दुमत नाही. पण नाण्याला दोन बाजू असतात, याचा विचार करणंही तितकंच आवश्यक आहे. एखादा रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी जातो अशावेळी त्या रुग्णाला त्याच दुखणं असह्य होतं अशावेळी त्यांची, त्यांच्या नातेवाईकांची थोडीफार चिडचिडही होते. याचवेळी जर रिसेप्शनिस्टकडून त्यांना योग्य तो परी उत्तर येत नसेल तर अशावेळी त्या रुग्णासह नातेवाईकांचाही त्रागा होतो.

सध्या मराठी भाषेवरून असलेला वाद पेटून उठला आहे. त्यामुळे अर्थातच या प्रकरणाला वेगळं वळण आलेलं पाहायला मिळत आहे. अर्थात त्या मारहाण करणाऱ्या इसमाची चूक आहे, पण ती चूक करायला अशा कोणत्या गोष्टीने उत्स्फूर्त केले याची देखील शहानिशा होणे तितकेच आवश्यक आहे.

आणखी वाचा – Video : ढसाढसा कॅमेरासमोर रडू लागली तनुश्री दत्ता, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “घरातच माझा छळ…”

नेमकं प्रकरण काय?
डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमआर बसले असल्यामुळे रुग्णांना काही काळ आत न पाठवण्याची सूचना रिसेप्शनिस्ट तरुणीला मिळाली होती. त्यामुळे तिने आरोपीसह इतर रुग्णांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले होते. मात्र, तरीही तो ऐकत नसल्याने तिने आरोपी गोकुळला आत जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे चिडलेल्या गोकुळने Kalyan Marathi Receptionist ला केसांना धरुन बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फूटेजही व्हायरल झाले.

Tags: Kalyan Hospital ReceptionistKalyan woman assaultviral video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
 Kajol breaks silence on breaking no kissing policy
Entertainment

“मला अस्वस्थ वाटतं”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने ३० वर्षांनी मोडली NO KISSING SCENE पॉलिसी, म्हणाली…

एप्रिल 24, 2026 | 10:13 am
Mumtaz On Interfaith Marriage
Entertainment

“माझ्याकडे पर्याय नव्हता…”, बॉलिवूड अभिनेत्रीने केलेलं हिंदू उद्योगपतीसोबत लग्न, करिअरच्या शिखरावर असताना अभिनय सोडला आणि…

एप्रिल 24, 2026 | 9:45 am
 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
Next Post
vijay patwardhan wife

डॉक्टरांनी बरिणीभर गाठी काढल्या, गोळ्यांची एलर्जी आणि…; 'पारू' फेम अभिनेत्याच्या पत्नीचा कठीण काळ, कर्करोगाने त्रासल्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.