२०२३ या येत्या वर्षात अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. वेगळ्या कथा, वेगळे विषय, नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटांच्या माध्यमातूम येणार आहेत. अशातच अजून एका नवीन मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता कैलास वाघमारेची प्रमुख भूमिका असलेला’घोडा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(kailash waghmare)

अभिनेता कैलाश वाघमारेने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून घोट या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्याने लिहिलं आहे “एक घोडदौड.. जगण्याची.. संघर्षाची.. स्वप्नांची..! घोडा या चित्रपटाच्या दिगदर्शन, निर्मितीची धुरा टी महेश यांच्या खांद्यावर आहे. मनाच्या अनेक महोत्सवांमध्ये घोडा या चित्रपटाने आपली छाप सोडली आहे. येत्या १३ फेब्रुवारी पासून ‘घोडा’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे.(kailash waghmare)
हे देखील वाचा – ‘महाराष्ट्र शाहीर’ यांचं हे गाणं राज्यगीत म्हणून जाहीर
एका सामान्य कटुंबातील वडिलांच्या मुलाच्या डोळ्यातील स्वप्नासाठीची तळमळ या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा जमीर अत्तर ने लिहिली आहे तर पटकथा निलेश महिगावकर यांनी लिहिली आहे. तान्हाजी द अंसंग वॉरियर, भिरकीट, भिकारी या आणि अशा आणिक चित्रपटात झळकल्यानंतर अभिनेता कैलास वाघमारे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(kailash waghmare)