सगळ्या नात्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रेमळ नातं समजलं जात ते म्हणजे वडील आणि मुलीचं. सध्या परदेशवारीत बिझी आहे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रेमळ बाप लेकीची जोडी. अभिनेता जितेंद्र जोशी आणि त्याची मुलगी रेवा लंडन येथे फिरण्यासाठी गेले आहेत. लंडन ट्रिपचा एक व्हिडिओ जितेंद्र ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.(Jitendra Joshi Daughter Reva)
पोस्ट केलेल्या व्हिडिओला जितेंद्र ने छान कॅप्शन देत लिहिलं आहे ” माझी मुलगी रेवा १३ महिन्याची असताना मी तिला पहिल्या ट्रिपला घेऊन गेलो होतो त्यानंतर आज ती १३ वर्षाची आहे तेव्हा मी पुन्हा तिला परदेशात ट्रिप साठी घेऊन जात आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण माझ्या बायकोमुळे आज हे शक्य झालं आहे. आता आम्ही पोहचलो आहे शेक्सपियरच्या देशात माझ्या प्रेमळ मुली सोबत”.

जितूच्या व्हिडिओ वर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी ने कमेंट करत लिहिले आहे “शेक्सपियरच्या शहरात आणि ते हे तुझ्या कवितां सोबत अजून काय हवं आहे? देव रेवाचं कल्याण करो आणि तुला खूप प्रेम” अशी कमेंट केली आहे. तर सोनाली कुलकर्णी, रसिक वेंगुर्लेकर, अभिजीत खांडकेकर, प्रसाद ओक, प्रियांका बर्वे, यांच्या सोबत अनेक कलाकारांनी रेवा आणि जितेंद्रला त्यांच्या ट्रिप साठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर चाहत्यांनी देखील जितेंद्रच्या या पोस्ट वर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत प्रेम दर्शवलं आहे.(Jitendra Joshi Daughter Reva)
हे देखील वाचा – “समाज काय म्हणेल….” म्हणून दत्तूच्या घरात मान्य न्हवत लव्हमॅरेज! वाचा तरीही कस जुळलं या दोघांचं नातं
जितेंद्रच्या कविता आणि जितेंद्रच्या अभिनयाचे जगभरात चाहते आहेत. मराठी चित्रपट , हिंदी वेबसिरीज अशा अनेक माध्यमांमध्ये जितेंद्र ने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तसंच त्याच्या गोदावरी या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले.