सध्या संपूर्ण देशभरात एकाच लग्न सोहळ्याची चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या लेकाचा लग्नसोहळा काल पार पडला. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. शुक्रवार ५ जुलै रोजी त्यांचा संगीत सोहळाही पार पडला. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या शाही आणि बहुचर्चित अशा लग्न सोहळ्याकडे देशासह जगभरातील लोकांचं लक्ष लागलं आहे. या लग्नाला वेगवेगळ्या देशातील पंतप्रधान, हॉलीवूड, बॉलीवूड आणि इतर क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहिले आहे.
प्रसिद्ध रेसलर जॉन सिनानेदेखील अनंत-राधिकाच्या लग्नासाठी खास हजेरी लावली आहेत. भारतीय पोशाखात जॉन सिना पाहायला मिळाला असून त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नासाठी जॉन सीनाने खास भारतीय पोशाख परिधान केला आहे. आकाशी रंगाच्या जोधपुरीमध्ये जॉन सीना दिसत असून पापाराझीसमोर त्याचा हटके अंदाज पाहायला मिळाला. जॉन सिनाच्या या हजेरीबद्दल एका मराठी कलाकाराने मिश्किल टिपणी केली आहे.

आणखी वाचा – अखेर अनंत अंबानी व राधिका मर्चंट अडकले लग्नबंधनात, नवविवाहित जोडप्याचा पहिला फोटो समोर
‘जीव माझा गुंतला’ मालिका फेम मराठी अभिनेता सौरभ चौघुलेने त्याच्या सोशल मीडियाद्वारे यावर मिश्किल टिपणी केली असून ही पोस्ट व्हायरल होत आहे. सौरभने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे असं म्हटलं आहे की, “जॉन सिना पण अंबानीच्या लग्नात?, शक्तिमान, अलादीन, अलीबाबा त्याचे चाळीस चोर, शिनचॅन, हेच काय ते उरलेत, बाकी सगळे तिथेच आहेत”. सौरभ चौघुलेच्या आधी सौरभ गोखले या अभिनेत्यानेदेखील अंबानी कुटुंबियांच्या नृत्यावर मिश्किल टिपणी केली होती. अशातच सौरभ चौघुलेही ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, अनंत-राधिकाच्या लग्नाआधी दोन प्री-वेडिंग सोहळे पार पडले. गुजरात येथील जामनगरमध्ये दोघांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा झाला. त्यानंतर दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटली-फ्रान्स असा प्रवास करत क्रूझवर पार पडला होता. त्यानंतर जुलै महिना सुरू होताच बरेच कार्यक्रम आणि समारंभ पाहायला मिळाले.