‘कलर्स मराठी वाहिनी’वरील लोकप्रिय यादीत “अंतरा मल्हारचा प्रवास संपला”, ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणची भावुक पोस्ट, म्हणाली, “असंच प्रेम…”एका मालिकेचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे ‘जीव माझा गुंतला’. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेने आजवर त्याच्या कथानकाने चाहत्यांना खुर्चीत खिळवून ठेवलं. अंतरा मल्हारची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना विशेष भावली. घर व करिअर अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारी अंतरा या मालिकेतून पाहायला मिळाली. तर रिक्षा चालवणारी अंतरा आणि बिझनेसमॅन मल्हार यांची अनोखी प्रेमकहाणी पाहून रंजक ठरलं. (Yogita Chavan Emotional Post)
अनेक संकटानंतर एकत्र आलेले अंतरा व मल्हार यांच्या नात्यात बरीच नवनवीन वादळ येत गेली. अंतरा गरोदर असल्यापासूनच तिच्यावर अनेक संकटं ओढवलेली पाहायला मिळाली. तिच्या पोटातलं मूल मारण्यापर्यंत सर्व कुरघोडी श्वेताने केल्या. श्वेता ही अंतराची बहीण दाखवण्यात आली, आणि वेळोवेळी ती अंतराच्या बाबतीत रोज नव्या कुरघोडी करताना दिसली. त्यामुळे प्रेक्षकांनी मध्यंतरी मालिकेला ट्रोलही केलं होत.
‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असल्याची बातमी समोर आली आहे. नुकतीच अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. यांत तिने मालिकेच्या शेवटचा सीन टेलिकास्ट झाला, असे म्हणत आठवणी शेअर करत काही फोटो पोस्ट केले आहेत.
योगिता चव्हाणने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेवटच्या दिवस म्हणत काही फोटो पोस्ट केले असून त्याखाली दिलेलं कॅप्शन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतंय. अंतराने कॅप्शन देत म्हटलं, “आज ‘जीव माझा गुंतला’चा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला. अंतरा मल्हारचा प्रवास जरी संपला असला तरी योगिता सौरभचा प्रवास सुरु झाला आहे. अंतरा मल्हार सारखं योगिता सौरभवर ही असंच प्रेम कायम देत राहा. आमच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल व आशीर्वादाबद्दल धन्यवाद.” असं म्हणत योगिताने प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.