गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तीन मुलं असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात, लोकांनी नको नको ते सुनावलं अन्…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने का घेतला होता असा निर्णय?

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 3, 2024 | 6:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jaya prada love marriage with shrikant nahata who has 3 childrens

तीन मुलं असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात, लोकांनी नको नको ते सुनावलं अन्...; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने का घेतला होता असा निर्णय?

बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मनोरंजन व राजकारणासह अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. जया प्रदा यांनी ८०-९० च्या दशकात सिनेजगतात खूप नाव कमावले. चित्रपटसृष्टीनंतर त्यांनी राजकारणाच्या दुनियेतही प्रवेश केला आणि तिथेही त्यांनी आपला ठसा उमटवला. मात्र, मनोरंजन ते राजकारण या प्रवासात जया प्रदा यांना अनेक वादांनाही सामोरे जावे लागले.

जया प्रदा यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये जवळपास २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. जया प्रदा यांनी धर्मेंद्र यांच्यापासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत त्या काळातील सर्वच बड्या कलाकारांबरोबर धमाकेदार भूमिका केल्या. जया यांच्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून झाली असली तरी त्यांना खरी ओळख बॉलिवूडमधूनच मिळाली.

View this post on Instagram

A post shared by Jaya Prada (@jayapradaofficial)

जया प्रदा या एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्या जेव्हा लोकप्रियतेच्या व प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. तेव्हा त्यांचे नाव चित्रपट निर्माता श्रीकांत नाहटा यांच्याशी जोडले गेले होते. मात्र, दोघेही या नात्याला नेहमीच मैत्री म्हणत असत. नंतर २२ जून १९८६ रोजी जया प्रदा यांनी श्रीकांत नाहटाबरोबर लग्न केले. त्यावेळी नाहटा विवाहित होते आणि त्यांना तीन मुले होती. तरीही केवळ प्रेमाखातर जया प्रदा यांनी श्रीकांतबरोबर लग्न केले.

आणखी वाचा – बायकोकडूनच मानसिक छळ, पैशांची मागणी अन्…; वैवाहिक आयुष्याला कंटाळून प्रसिद्ध शेफ कुणाल कपूरचा घटस्फोट, १६ वर्षांनंतर मोडला संसार

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, जया प्रदाबरोबर लग्न केल्यानंतरही नहाटा यांनी आपल्या पहिल्या घटस्फोट दिला नव्हता. याशिवाय त्यांनी जयाला आई होण्याचा आनंदही दिला नाही. त्यामुळे कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि हळूहळू ते एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर जयाप्रदा यांनी आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले.

आणखी वाचा – Video : भर कार्यक्रमातच सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने साडी नेसून भरली भाऊ कदमांची ओटी, म्हणाला, “इतके वर्षे तुम्ही शांताबाई साकारली…”

दरम्यान, जया प्रदा यांचे खरे नाव ललिता राणी होते, त्यांचा जन्म ३ एप्रिल १९६२ रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. मनोरंजन सृष्टीत आल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून जया प्रदा ठेवले. जया यांनी वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी सिनेविश्वात प्रवेश केला होता.

Tags: bollywood actressBollywood entertainment newsjaya prada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
actor bhau kadam

भाऊ कदम उलटा सदरा-लेंगा घालून स्टेजवर पोहोचले अन्…; स्वतःच केला खुलासा, म्हणाले, "अचानक काय झालं समजलं नाही तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.