Jaya Bachchan Gets Angry : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांचा मूड बर्याचदा खराब असलेला पाहायला मिळतो. त्यांच्या या स्वभावामुळेच त्या बर्याचदा चर्चेत असतात. कधीकधी त्या पापराजींवर भडकतात आणि कधीकधी त्यांना फटकारतानाही दिसतात. त्यांच्या या वागणुकीनंतर लोक काय म्हणतील याचा त्या यावेळी अजिबात विचारही करत नाहीत. एखादी कृती त्यांना कशी वाटते यावर त्या प्रतिक्रिया देतात आणि यासाठी त्या बरेचदा टीकेच्या मानकरीही झाल्या आहेत. आता त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यावर लोक विविध मार्गांनी प्रतिक्रिया देत आहेत.
अभिनेता मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी ४ एप्रिल रोजी सकाळी ३:३० वाजता निधन झाले. यावेळी त्यांच्या मुलांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यानंतर ६ तारीखला प्रार्थना बैठक घेण्यात आली. जिथे सर्व बॉलिवूड सिनेविश्वातील कलाकार उपस्थित होते. उदित नारायण, जॉनी लिव्हर, आशा पारेख, राकेश रोशन, रणजित, आमिर खान, प्रेम चोप्रा, पद्मिनी कोल्हापुरी, सोनू निगम यासारख्या सेलिब्रिटींना यावेळी स्पॉट केले गेले.
जया बच्चनसुद्धा या निमित्ताने प्रार्थना सभेत सहभागी झाल्या होत्या. पांढर्या रंगाच्या सलवार-कमीझमध्ये, काळ्या स्लिंग पर्ससह त्या या सभेत उपस्थित होत्या. जेव्हा त्या दाराकडे उभ्या होत्या जेव्हा एका बाईने तिच्या पाठीवर हात ठेवत खुणावलं. या कृतीने त्यांना धक्का बसला आणि मागे वळून त्यांनी त्या अज्ञात बाईचा हात धरला आणि त्या बाईला हादरवून सोडले. यावेळी त्या महिलेचा नवराही जया यांना भेटण्यासाठी पुढे आला होता. त्यानंतर दोघांनी आपले हात जोडून नमस्कार म्हटलं पण अभिनेत्रीने असे काहीतरी सांगितले जे ऐकून दोघेही तिथून निघून गेले.
आणखी वाचा – २१व्या वर्षी लग्न, २५शीमध्ये दोन मुलं कारण…; स्वप्नील राजशेखर यांचं खासगी आयुष्याबाबत भाष्य
जया बच्चन यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “अशा माथेफिरू लोकांबरोबर फोटो कशाला काढायचा?”. तर एकाने लिहिले,”याची सून ऐश्वर्याबाबत विचार करा ती हिला कसं सहन करत असेल”. तर एकाने म्हटले, “हे सगळं अमिताभ भाऊच सहन करु शकतात”. “अमिताभला अभिवादन केले पाहिजे, यांच्यासारख्यांना ते सहन करीत आहेत”, “मला त्या जोडप्यांसाठी वाईट वाटते”, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. तर एकाने जयाला रेखाकडून मानवता शिकण्याचा सल्ला दिला.