Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशच हादरुन गेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो व व्हिडीओ पाहून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह देशातील इतर पर्यटकांनी या हल्ल्यामध्ये आपला जीव गमावला. कोणी आपल्या लेकासाठी टाहो फोडत होतं, तर कोणी आपल्या नवरा गेला म्हणून किंचाळत होतं. आपल्या जवळच्याच व्यक्तींच्या आयुष्यासाठी लोक पदर पसरत होते. मात्र त्या नराधमांनी धर्म विचारत थेट हल्ला केला. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत कलाकारही संताप व्यक्त करत आहेत. विविध प्रश्न सरकारला विचारत आहेत. (pahalgam terrorist attack Bollywood actors reaction)
अनुपम खेर यांनी तर रोखठोक सवाल केले. ते म्हणाले, “मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. काश्मीरी हिंदूंबरोबर हे होताना मी पाहिलं होतं. ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट याचाच एक भाग आहे. या चित्रपटाला सगळ्यांनी प्रोपगंडा म्हटलं होतं. पण आता देशभरातून आलेल्या विविध व्यक्तींना त्यांचा धर्म विचारुन मारण्यात आलं. जी महिला आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसली आहे तो फोटो मी विसरुच शकत नाही”.
ग़लत … ग़लत… ग़लत !!! पहलगाम हत्याकांड!! शब्द आज नपुंसक हैं!! 💔 #Pahalgam pic.twitter.com/h5dOOtEQfx
— Anupam Kher (@AnupamPKher) April 22, 2025
आणखी वाचा – “हल्लेखोर स्थानिक मदतीशिवाय पोहोचलेच कसे?, घरात घुसून मारा”, पहलगाम हल्ल्याप्रकरणी मराठी कलाकार भडकले
They killed our people in cold blood. This can’t be forgiven, these terrorists need to know we are not staying quiet. We need to retaliate, I request our Prime Minister @narendramodi ji, Home Minister @AmitShah ji and Defence Minister @rajnathsingh ji to give them what they…
— Sanjay Dutt (@duttsanjay) April 22, 2025
पुढे ते म्हणाले, “एका महिलेची मी मुलाखत ऐकत होतो. ती म्हणत होती माझ्या नवऱ्याला मारलं मलाही मारा. हे सगळं पाहून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना एवढीच विनंती करतो की, या दहशतवाद्यांना असा धडा शिकवा की ते सात जन्म हे कृत्य करण्याच्या लायकीचे राहणार नाहीत. जगभरातील कोणत्याही कानाकोपऱ्यात हे कृत्य होणं चुकीचं आहे”. संजय दत्त म्हणाला, “त्यांनी आपल्या लोकांना अत्यंत वाईट पद्धतीने मारलं. याला माफी मिळणार नाही. आम्ही गप्प बसणार नाही हे या दहशतवाद्यांना समजलंच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शाह यांना विनंती करतो की, यांना अशी शिक्षा द्या की ज्याच्या ते लायक आहेत”.
Om Shanti. 🙏🏻🕉️🙏🏻 condolences.
— Raveena Tandon (@TandonRaveena) April 22, 2025
Shocked and angry . No words to express the anguish. Prayers and strength to the victims . Time we all let go of petty in-house fighting , UNITE and realise the true enemy. https://t.co/zSUIGHo1QP
A shadow of sorrow falls heavy today, as news of the horrific terror attack in Kashmir breaks our hearts. Sending deepest condolences and prayers to all the families who have tragically lost loved ones.
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) April 22, 2025
Now, more than ever, the world must come together in solidarity against…
विवेक ओबेरॉट, रविना टंडन, तुषार कपूर, सोनू निगम यांसारख्या कलाकारांनीही संताप व्यक्त केला. तसेच पीडितांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडे विनंती केली. अक्षय कुमार म्हणाला, “पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हादरवून टाकणारा आहे. हैवानांनी निष्पाप जीवांना टार्गेट केलं. मी त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो”. बॉलिवूड कलाकारांच्या मतेही सरकारने दहशतवाद्यांना योग्य ती शिक्षा देणं गरजेचं आहे.