शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

देवदत्त नागेंचा ‘जय मल्हार’ मालिकेतील आठवणींना उजाळा, जेजुरीत नवं घर घेण्याचं स्वप्नही पूर्ण, म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 25, 2025 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Devdatta Nage new house

देवदत्त नागेंचा 'जय मल्हार' मालिकेतील आठवणींना उजाळा, जेजुरीत नवं घर घेण्याचं स्वप्नही पूर्ण, म्हणाले…

Devdatta Nage new house : ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे देवदत्त नागे. खंडेरायाच्या भूमिकेमुळे देवदत्त यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यांनी आजवर हिंदी, मराठी, साऊथ सिनेविश्वात काम केलं आहे. पण ‘जय मल्हार’ मालिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर ते बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ नेहमीच शेअर करतात. अशातच देवदत्त यांनी काही दिवसांपूर्वीच जेजुरीमध्ये जमीन खरेदी केली आणि लवकरच त्यांचं जेजुरीमध्ये घर घेण्याचं स्वप्नही ते पूर्ण करणार आहेत. या गोड बातमीनंतर देवदत्त यांनी जय मल्हार मालिकेदरम्यानच्या काही आठवणींना उजाळा देत खास पोस्ट शेअर केली आहे.

देवदत्त यांनी ‘जय मल्हार’ मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो पोस्ट केले आहेत. आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी काही खास फोटोंसह कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “‘जय मल्हार’चा पहिला भाग १८ मे २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि माझा श्री खंडेरायांप्रति एक अलौकिक प्रवास सुरु झाला. मनात येईल तेव्हा श्री खंडेरायांच्या, म्हाळसाआई, बानूआईच्या दर्शनाला जायचो आणि आशीर्वाद घ्यायचो हा नियम होता. रात्री ११ला पॅकअप व्हायचं आणि तिथेच सेटवर स्नान करुन लगेच गाडीला स्टार्टर मारुन थेट माझी जेजुरी गाठायचो. मध्यरात्री साधारण ३ वाजता पोहोचायचो. मग ५-५:३० पर्यंत रस्त्यावरच गाडीमध्ये बसुन राहायचो. त्यानंतर श्री खंडोबाचं दर्शन आणि मग परतीचा प्रवास करायचो”.

आणखी वाचा – कोयता घेऊन अंगावर धावले, बेशुद्ध होईपर्यंत मारलं आणि…; ज्येष्ठ अभिनेत्रीचा वडिलांबाबत खुलासा, म्हणाल्या, “लागलेलं असताना…”

नवीन घराबाबत ते म्हणाले, “श्री खंडोबाची प्रेमळ ओढ त्या दिवसांपासून अगदी आजपर्यंत तशीच आहे. गेली तीन-चार वर्ष वाटायला लागलं होतं की, तिथेच आपलं एक छोटंसं घर असावं; पण माझ्यासाठी हा खूप मोठा निर्णय होता. एक दिवस बारामतीहून जेजुरीकडे जाताना त्या पुलावरुन सहज लक्ष गेलं, तिथे काही प्लॉटिंग्स होते. त्या जागेवर जाऊन बघितलं, तर तिथून श्री खंडेरायांच्या जेजुरी गडाचं मनमोहक दर्शन घडलं. त्या दिवशी मित्र परिवारातील एका मित्राच्या दुकानाचं उदघाटन आटोपलं आणि माझा मित्र युवराजने सुचवलेल्या एका ठिकाणी मध्यरात्री राहिलो. पहाटे जाग आली, तेव्हा सहज त्या खिडकीतून लक्ष गेलं, तर समोर साक्षात जेजुरी गड आणि श्री खंडेरायांचं अलौकिक दर्शन. तेव्हाच जेजुरीमध्ये मानत येईल तेव्हा आणि जमेल तेव्हा वास्तव्य करायचं पक्क केलं”.

View this post on Instagram

A post shared by Devdatta Gajanan Nage (@devdatta.g.nage)

“सोन्याच्या जेजुरीमध्ये माझी बहीण सौ. अमृताताई आणि भावोजी श्री. संदीपजी घोणे यांच्या शुभ हस्ते आमच्या नवीन जागेचं भूमिपूजन केलं. तेव्हा आमचे डीलर डॉ. राजेश साठेसुद्धा उपस्थित होते. ते या उपयुक्त जागेसाठी ब्रँड अँबेसेडर शोधत होते आणि त्यांनी मला त्यासाठी विनंती केली. मी सुरुवातीला प्रांजळपणे नकार दिला; पण माझे जेजुरीचे जवळचे मित्र कन्हैया आणि प्रथमेश या दोघांनी डॉ. राजेश साठे खरंच चांगली व्यक्ती आहेत आणि त्यांच्यासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करण्याचं सुचवले”.

आणखी वाचा – शिल्पा शेट्टीच्या फिटनेसचे गुपित माहित आहे का?, वयाच्या ५०व्या वर्षीही तरुणाईला लाजवेल अशी आहे त्वचा, फक्त एक चमचा खोबरेल तेल आणि…

अभिनेते शेवटी म्हणाले, “अशा प्रकारे श्री खंडेरायांच्या आशीर्वादानं माझं जेजुरीमध्ये घर होत आहे आणि जिथे माझं घर उभारत आहे, त्या पवित्र जागेचं ब्रॅण्डिंगही मीच हाताळत आहे. गेली १२ वर्ष मी न चुकता जेजुरीला श्री खंडेरायांच्या दर्शनाला येतोय. श्री खंडेरायांच्या चरणी माझी सेवा ते रुजू करुन घेत आहेत. त्याचंच हे फलित आहे, असं मला वाटतं. माझ्या जेजुरीतील मित्रांचे, कुटुंबाचे माझ्यावर असणारे प्रेम आणि श्री खंडेरायांची कृपा खरंच अलौकिक आहे. आज प्रदर्शित होणारा गोल्डन जेजुरीच्या जाहिरातीचा पहिला व्हिडीओ तुम्हाला आणि श्री खंडेरायांच्या चरणी समर्पित आहे”.

Tags: devdatta nagemarathi actornew home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
 Sankarshan Karhade Emotional

संकर्षण कऱ्हाडेच्या 'तू म्हणशील तसं' नाटकाचा शेवट, निरोप घेताच अभिनेता भावुक, म्हणाला, "तुमच्या मनांत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.