शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जेजुरीत खंडोबाच राहायला येणार! ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्याच जेजुरीत होणार हक्काचं घर, भूमिपुजनाचे फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 18, 2025 | 12:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor house purchase

जेजुरीत खंडोबाच राहायला येणार! 'जय मल्हार' फेम अभिनेत्याच जेजुरीत होणार हक्काचं घर, भूमिपुजनाचे फोटो समोर

Marathi actor house purchase : प्रत्येकाचं स्वतःचं घर असावं हे स्वप्न असतं. बरेचजण कामाच्या ठिकाणी आपलं घर व्हावं असा विचार करतात. घर घेण्यासाठी ही मंडळी दिवस-रात्र मेहनत करताना दिसतात. अनेक कलाकार मंडळीही त्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करताना दिसली आहेत. चाहत्यांसह ते आनंदाची बातमी वेळोवेळी शेअर करतात. बरेच असे कलाकार आहेत ज्यांनी मुंबईसारख्या झगमगत्या शहरात स्वतःच घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. तर काहींनी सेकंड होम म्हणून गावाकडे वा एखाद्या शांत, निसर्गाच्या सान्निध्यात आपलं घर घेतलं आहे. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने घरासाठी नवी जागा घेतली आहे. हा अभिनेता म्हणजे जय मल्हार फेम देवदत्त नागे.

‘जय मल्हार’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे देवदत्त नागे. देवदत्त नागे यांनी या मालिकेत साकारलेली देव खंडेरायाचीही भूमिका बरीच गाजली. आज मालिका संपून बरीच वर्ष झाली असली तरी खंडेरायाच्या भूमिकेतील देवदत्त यांना काही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत. याच देवदत्त यांनी त्यांनी साकारलेल्या खंडेरायाच्या जागेत म्हणजेच जेजुरीमध्ये घरासाठी जागा घेतली असून लवकरच ते नवं घर बांधणार आहेत. नुकताच त्यांनी भूमिपूजनाचे खास फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली.

आणखी वाचा – “धक्कादायक घटना आणि…”, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने शेअर केलेला व्हिडीओ पाहून प्रेक्षक भावुक, म्हणाले, “घरातील कोणीतरी गेल्यासारखं वाटतंय”

View this post on Instagram

A post shared by Devdatta Gajanan Nage (@devdatta.g.nage)

देवदत्त यांनी पोस्ट शेअर करत, “येळकोट येळकोट…जय मल्हार. श्री खंडेरायांच्या कृपेने साक्षात श्री खंडेरायांच्या सान्निध्यात माझे स्वतःचे घर जेजुरीमध्ये. श्री खंडेरायांच्या चरणी माझी सेवा रुजू झाली हे माझे परम भाग्य. माझी बहिण सौ.अमृता ताई आणि माझे भाऊजी श्री. संदिपजी घोणे यांच्या शुभ हस्ते भूमी पूजन. आणि जिथे घर उभे राहणार आहे तिथे श्री खंडेरायांचे जागरण गोंधळ म्हणजे केवळ आनंद. सदानंद. बा. श्री. खंडोबा. आता मनामध्ये येईल तेव्हा मला तुझ्या सान्निध्यात राहायला मिळणार. तुझी सेवा माझ्याकडून निरंतर घडणार. माझ्याकडून तुझी सेवा अशीच घडू दे रे बा. सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट… जय मल्हार”, असं म्हटलं.

आणखी वाचा – “मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजींच्या ‘त्या’ वाक्याने जुई झालेली सुन्न, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “स्मशानात शांत झोपलेलं बघून…”

यावेळी त्यांनी त्यांच्या जेजुरी येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या भूमिपूजनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. देवदत्त यांची ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “असं वाटतं साक्षात खंडोबा महाराज जेजुरीत राहायला येणार”, “येळकोट येळकोट जय मल्हार”, “सर आपली भेट कधी होणार खंडोबालाच माहीत”, अशा कमेंट चाहत्यांनी त्यांच्या या पोस्टवर केल्या आहेत.

Tags: marathi actornew home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
 nakuul mehta blessed with baby girl

टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता झाला बाबा, लग्नाच्या १३ वर्षांनी घरी आली लक्ष्मी, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.