nakuul mehta blessed with baby girl : टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता नकुल मेहताने चाहत्यांसह आनंदाची बातमी दिली आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी ‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेत्याने दुसऱ्यांदा वडील झाल्याची गुडन्यूज दिली आहे. नकुल मेहताची पत्नी जानकी परीख यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एका चिमुकलीला जन्म दिला. नकुल मेहता यांनी स्वत: सोशल मीडियावर या विशेष प्रसंगाची छायाचित्रे शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. नकुल व जानकी या दोघांनीही लेक झाल्याची बातमी दिली. नकुलने शेअर केलेल्या फोटोंवरुन त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं.
नकुल मेहता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुलीबरोबरचा गोंडस फोटो पोस्ट केला आहे आणि “ती आली” असं म्हटलं आहे. फोटोंच्या एका झलकेत, नकुल मुलीकडे पाहताना दिसत आहे. दुसर्या फोटोमध्ये, त्याचा मुलगा सुफी त्याच्या धाकट्या बहिणीबरोबर खूप आनंदी दिसत आहे. नकुल आणि जानकी यांनी त्यांच्या चिमुकलीला रुमी हे नाव दिले आहे. या नावाचा अर्थ सुंदर आहे. नकुल यांनी १ जून २०२५ रोजी आपल्या पत्नीची दुसरी गर्भधारणा जाहीर केली.
“अखेर ती आली. सुफीला अखेर तिची रूमी भेटली. आमची मनं भरली आहेत. १५ ऑगस्ट २०२५… प्रेम शोधणं हा टास्क नाही, तर फक्त तुमच्या आत असलेल्या सर्व अडथळ्यांना शोधून त्याविरोधात उभं राहणं आहे”, असं कॅप्शन देत त्याने हे खास फोटो शेअर केले. नकुल मेहता यांनी मुलीच्या जन्माची बातमी सांगताच सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री गौहर खान यांनी लिहिले की, मी तुमच्या कुटुंबासाठी खूप आनंदी आहे, देवाची कृपा कायम आहे. कॉमेडी क्वीन भारती सिंह यांनीही रुमीचे स्वागत केले आणि अभिनंदन असे लिहिले. त्याच वेळी, अभिनेत्री दिया मिर्झाने नकुल आणि तिच्या कुटुंबियांना खूप प्रेम आणि शुभेच्छा दिल्या.
२ जानेवारी २०१२ रोजी नकुला आणि जानकी यांनी लग्न केले. २०२१ मध्ये दोघेही पहिल्यांदा आई-बाबा झाले. यावेळी त्यांचा मुलगा सूफी यांचा जन्म झाला. आता मुलगी रुमीच्या आगमनाने नकुल आणि जानकीचे कुटुंब पूर्ण झाले आहे. नकुल मेहता हे टीव्ही उद्योगातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. २०१२ मध्ये त्यांनी ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या शोसह लोकप्रियता गाठली. यानंतर, तो ‘इश्कबाझ’, ‘दिल बोले ओबेरॉय’, ‘बडे अच्छे लगते है 2’ सारख्या शोमध्ये दिसला. या व्यतिरिक्त, नकुल मेहता ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ सारख्या कार्यक्रमांचा एक भाग आहे.





