Itsmajja Paus Series : ‘पाऊस’… हा कायमच प्रत्येकासाठी स्पेशल असतो. पावसाबरोबरच्या अनेकांच्या आठवणी या अविस्मरणीय असतात आणि या आठवणी बेभान करणार्या असतात. या पाऊस आणि प्रेमाचा सुंदर मिलाप असलेली ‘इट्स मज्जा’ची ‘पाऊस’ ही सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वेबसीरिजमधून प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणाऱ्या सायली आणि विशालची लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. Wrong Number ने सुरु झालेली सायली-विशाल यांची Right Lovestory प्रेक्षकांना खूपच भावली. या दोघांमधील प्रेमाचे काही खास क्षण प्रेक्षकांनी चांगलेच एन्जॉय केले. (Itsmajja Paus Series End)
या सीरिजला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. या सीरिजच्या प्रत्येक आगामी भागाची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असायची. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षक व्यक्त करत असत. मात्र प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात ‘पाऊस’ या सीरिजने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही सीरिज संपू नये अशी प्रेक्षकांची इच्छा होती. पण या सीरिजने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. १९ भागांमध्ये या सीरिजची सांगता झाली आहे. नुकताच या सीरिजचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला आहे. नुकतंच सायलीचे रोहितबरोबर लग्न झाल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. त्यानंतर सायली गरोदर असल्याचेही पाहायला मिळाले.
विशालच्या आठवणीत सायलीने त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण तो तिथे नसल्याने तिने त्याला एक पत्र लिहिले, ज्यात तिने तिचं लग्न झाल्याचे सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून सायली-विशाल एकमेकांपासून वेगळे झाले होते. त्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अखेर आता सायली-विशाल एकमेकांसमोर आले आहेत. ‘पाऊस’ सीरिजच्या शेवटच्या भागात सायली-विशाल यांनी एकमेकांची भेट घेतली असून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला आहे.
आणखी वाचा – ठरलं! मराठी CID ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जबरदस्त प्रोमोने वेधलं लक्ष, उत्सुकता शिगेला
त्यामुळे Wrong Number ने सुरु झालेल्या सायली-विशाल यांच्या Right Lovestory चा अखेर The End झाला आहे. ‘पाऊस’ या सीरिजमध्ये ‘सुंदरी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री आरती बिराजदारने सायली ही भूमिका साकारली आहे, तर आरतीला अभिनेता अक्षय खैरेची साथ मिळाली आहे. अक्षय खैरेसुद्धा आजवर अनेक मालिकांमध्ये विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला.
आणखी वाचा – Appi Aamchi Collector : अमोलमुळे अप्पी-अर्जुनमध्ये जवळीक, पुन्हा बहरणार प्रेम, कायमचं एकत्र येणार का?
दरम्यान, ‘पाऊस’ या सीरिजची कथा व दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’ या गाजलेल्या सिरिजच्या नितीन पवार यांनी केले या नवीन सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी केली. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे आहेत. ‘पाऊस’ ही लोकप्रिय सीरिज ‘इट्स मज्जा’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलद्वारे प्रदर्शित केली जात होती. अशातच या सीरिजने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.