बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाळेचं केलेलं नुकसान भरून काढण्यासाठी ‘दहावी-अ’च्या मुलांचं घरकाम, आभ्याला मदत करणं केवडाला महागात पडणार

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 19, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
itsmajja original webseries Dahavi-A daily updates episode 4 abhya, kevda reshma see the details

'दहावी-अ'च्या आगामी भागात काय नवीन पाहायला मिळणार? जाणून घ्या...

Dahavi-A daily updates : ‘इट्स मज्जा’च्या नवीन ‘दहावी-अ’ या वेब सीरिजचे आतापर्यंत एकूण चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.  दर सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पहिल्या भागात सुरुवातीला आभ्या, विक्या, किरण्या व मध्या हे चौघे इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना पाहायला मिळाले. इंग्रजी विषयावरुन या मित्रांमधली मजामस्ती या सीनमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या भागात शाळेच्या संस्थेतील एक मुख्य व्यक्ती शाळेच्या पाहणीसाठी येतात आणि तेमुलांची तुकडीनुसार विभागणी करायला सांगतात. तिसऱ्या भागात या मुलांची विभागणी करण्यात आली आहे. (Dahavi-A daily updates)

‘दहावी-अ’मधून त्यांना ‘दहावी-ड’मध्ये जाण्यास सांगितले जाते. मात्र शाळेचा हा निर्णय मुलांना आवडला नसून याबद्दल ते मुख्याध्यापकांकडे जातात आणि त्यांना हा निर्णय मान्य नसल्याचे सांगतात. मात्र हा निर्णय तुम्हाला मान्य करावाच लागेल असं मुख्याध्यापक मुलांना ठणकावतात. त्यामुळे चिडलेली मुलं शाळेतील वस्तूंचं नुकसान करतात आणि पळ काढतात. यानंतर चौथ्या भागात मुलांना त्यांनी केलेल्या चुकीची समाज आली आहे. यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी ते कांबळे सरांची मदत घेतात. त्यावर कांबळे सर त्यांना मी कुठलीही मदत करणार नसून जे काही नुकसान झालं आहे ते भरून द्यावं लागेल असं सांगतात.

आणखी वाचा – Video : साधंच घर, शेती अन् सुंदर वातावरण, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने दाखवलं तिचं कोकणातलं गाव, व्हिडीओ व्हायरल

त्यामुळे सगळी मुलं शाळेच्या झालेल्या नुकसान भरपाईचा खर्च भरून काढण्यासाठी मेहनत घेण्याचे ठरवतात. यासाठी ते गावोगावी जाऊन कोणतंही काम करण्याचा निर्णय घेतात. यासाठी त्यांनी एका घरात कामही केलं आहे. मात्र यातून त्यांना कमी पैसे मिळाले आहेत. नुकसान भरपाईची एकूण रक्कम भरून काढण्यासाठी ते शाळेत न जाता पूर्ण दिवस काम करण्याचा निर्णय घेतात. मात्र याचवेळी त्यांना शाळेच्या दहावी-अ या महत्त्वाच्या वर्षाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचीही जाणीव होते.

आणखी वाचा – Bigg Boss 18 चा ग्रँड फिनाले कधी होणार?, विजेत्याला मिळणार तब्बल इतकी रक्कम, कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार?

त्यामुळे आता आगामी भागात नेमकं काय बघायला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आभ्या, विक्या, रेश्मा, केवडा, किरण्या, मध्या हे सर्व मिळून शाळेचे नुकसान भरू शकतील का? त्यांना मदत करणारी केवडा यात अडकणार तर नाही ना? आणि या सगळ्यातून कांबळे सर त्यांना काय धडा शिकवणार? हे येत्या भागात पाहायला मिळणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आगामी भागातून मिळतील.    

Tags: Dahavi-A daily updatesDahavi-A Series Episode 4Dahavi-A Series Episode 4 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
jackie shroff on saif ali khan

सैफ अली खानवरील हल्ल्याबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ यांचा राग अनावर, म्हणाले, "जे झालं ते वाईट पण..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.