गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘दहावी अ’च्या कलाकारांचं मोठं स्वप्न पूर्ण, गुगल ऑफिसची सफर अन् बरंच काही

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 16, 2025 | 6:28 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
dahavi a webseries actors

'दहावी अ' वेबसीरिजच्या कलाकारांची गुगल ऑफिसमध्ये सफर

सोशल मीडियाची ताकद नक्की काय आहे? हे सामान्य माणसांसह कलाकार मंडळी अधिकाधिक अनुभवतात. ओटीटी प्लॅटफॉर्म, युट्यूबद्वारे सुरु असणाऱ्या वेबसीरिजला तर प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो. त्यातीलच एक वेबसीरिज म्हणजे ITSMAJJA ची ‘दहावी अ’. ‘आठवी अ’ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘दहावी अ’चा जन्म झाला. वेबसीरिजमधील कलाकारांनी तर अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलं. या कलाकारांचा चाहतावर्ग तर फार मोठा आहे. सध्या ‘दहावी अ’चे कलाकार मुंबई दर्शन करत आहेत. त्यादरम्यान त्यांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. (dahavi a webseries actor Mumbai trip)

‘दहावी अ’ची मुलं काही दिवसांपूर्वीच मुंबईत आली आहे. मुंबई आल्यानंतर प्रथम त्यांनी सिद्धीविनायकचे दर्शन घेतलं. त्यानंतर ही मंडळी मुंबईतील विविध ठिकाणी गेली. स्वप्नांच्या नगरीत त्यांनी प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. पण त्यांचं एक स्वप्न सत्यात उतरलं. ते स्वप्न म्हणजे ‘दहावी अ’ची मंडळी थेट गुगल ऑफिसमध्ये पोहोचले. गुगल ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी युट्युब सेक्शनला भेट दिली. तिथे त्यांनी मजेशीर गप्पा मारल्या.

आणखी वाचा – ‘दहावी अ’च्या कलाकारांची जीवाची मुंबई, Snow World मध्ये मस्ती ते जुहू बीचवर खाण्यासाठी मारला ताव

गुगल ऑफिसची सफर करत असताना त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथेच त्यांनी जेवणही केलं. विविध गेम्स मुलांना खेळता आले. शिवाय वर्षाच्या शेवटाकडे ITSMAJJA चे किती सब्स्क्रायबर्स होतील असं ‘दहावी अ’च्या मुलांना विचारण्यात आलं. तेव्हा या मुलांनी अगदी प्रोत्साहन वाढवणारी उत्तरं दिली. ITSMAJJA ४ ते ५ मिलियनचा टप्पा पार करणार अशी आशा मुलांनी व्यक्त केली.

आणखी वाचा – “लोक अक्कल शिकवतील की…”, लेकाचा व्हिडीओ शेअर करत शशांक केतकरची पोस्ट, शिक्षिकेसाठी पत्र अन्…  

ज्या माध्यमात आपण काम करतो तिथे जाऊन थेट काम कसं होतं हे पाहणं ‘दहावी अ’च्या कलाकारांना सरप्राइज करणारं होतं. आता आणखी एक सुखद धक्का या मुलांसाठी असणार आहे. ‘दहावी अ’ची मुलं १७ एप्रिलला वानखेडे येथे होणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यासाठी हजेरी लावणार आहेत. संयोगिता, सृष्टी, अथर्व, ओम, श्रेयस, सत्यजीत, रुद्र हे सगळेच कलाकार धमाल-मस्ती करताना दिसतील.  

Tags: entertainment newsmarathi actormarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

adhyayan suman on nepotism
Entertainment

वडील सुपरस्टार तरीही कामासाठी वणवण; शेखर सुमन यांच्या लेकाची खंत, म्हणाला, “दोष इंडस्ट्रीला देऊ का?”

जून 5, 2025 | 3:24 pm
Ashok Saraf Son
Entertainment

“मी त्यांच्यापासून हजारो मैल दूर आहे पण…”, अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित्त लेकाची भावुक पोस्ट, म्हणाला, “त्यांच्या माणुसकीचं…”

जून 5, 2025 | 2:54 pm
"थोडीतरी लाज बाळगा", ६६ वर्षीय नीना गुप्तांनी ओलांडल्या वयाच्या मर्यादा, बोल्ड लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, "म्हातारपणात..."
Entertainment

“थोडीतरी लाज बाळगा”, ६६ वर्षीय नीना गुप्तांनी ओलांडल्या वयाच्या मर्यादा, बोल्ड लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “म्हातारपणात…”

जून 5, 2025 | 12:48 pm
Anushka Sharma On RCB Victory Parade Turns Stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू अन्…; विराट कोहली पाठोपाठ अनुष्का शर्माची प्रतिक्रिया, म्हणाली…

जून 5, 2025 | 12:01 pm
Next Post
Neha Kakkar Got A Permanent Tattoo

नेहा कक्करचा भावासाठी टॅटू, टोनीने चक्क तिचे पायच धरले अन्…; बहिणीने नातं तोडल्यानंतर…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.