शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जिनिलिया देशमुखचं पुतणीबरोबर आहे खास बॉण्डिंग, धनत्रयोदशीला औक्षण करताच अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी अन्…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 18, 2025 | 3:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
genelia deshmukh niece

जिनिलिया देशमुखचं पुतणीबरोबर आहे खास बॉण्डिंग, धनत्रयोदशीला औक्षण करताच अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी अन्…; व्हिडीओ व्हायरल

genelia deshmukh niece : अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्या अभिनयाबरोबरच कुटुंबालाही नेहमीच प्राधान्य देताना दिसतात. अभिनयाची, करिअरची धुरा सांभाळत या अभिनेत्री त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्याही पेलवताना दिसतात. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत या अभिनेत्री कुटुंबाला वेळ देतात. यापैकी एक म्हणजे अभिनेत्री जिनिलिया देशमुख. जिनिलियाने आजवर तिच्या स्वभावाने रसिक प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. जिनिलिया सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या जिनिलिया तिच्या कुटुंबासह दिवाळी एन्जॉय करत आहे.

दरवर्षी देशमुख कुटुंब लातूर येथील त्यांच्या घरी सहकुटुंब जमतात. आणि सगळ्याच सणाला जसं जमेल तसं हे कुटुंब त्यांच्या मूळ गावी एकत्र जमताना दिसतं. अशातच यंदाच्या दिवाळीलाही देशमुख परिवार एकत्र जमलं आहे. आज धनत्रयोदशीच्या दिवशीही हे कुटुंब एकत्र जमलं आहे. धनत्रयोदशीच्या दिवशीचा स्पेशल व्हिडीओ जिनिलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यांत जिनिलियाची पुतणी तिचं औक्षण करताना दिसत आहे. हा भावुक व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

आणखी वाचा – “आता माझी हेल्थ साथ देत नाही तरीही…”, ‘ठरलं तर मग’मधील एंट्रीनंतर रोहिणी हट्टंगडी यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “या वयामध्ये…”

जिनिलीयाने तिची पुतणी दिवीयानासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने हा सुंदर असा व्हिडीओ शेअर करतं असं लिहिलं आहे की, “ही आमच्या घरची गोड मुलगी; जिच्यावर माझं मनापासून प्रेम आहे. ती फुटबॉल खेळते, तिला नेहमीच वेगळं काहीतरी करायला आवडतं. आज तिने माझं औक्षण केलं. खरंच, तिला माझं औक्षण करताना पाहून माझे डोळे पाणावले . खूपच भरुन आलं. आय लव्ह यू दिवू, मला तुझा खूप खूप अभिमान आहे. तू कल्पनाही करु शकत नाहीस इतका. धिरज व दीपशिखा हे खरे तुमचे संस्कार आहेत”.

आणखी वाचा – दोन जीव प्रेमाने जोडत, पुन्हा नव्याने भेटीस येतोय ‘पाऊस २’, नवोदित जोडीच्या अभिनयाने वेधलं लक्ष

जिनिलीयाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री दिवीयानाला प्रेमाने जवळ घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिनिलीयाचा व्हिडीओ शेअर करत दिपशिखाने, “हा व्हिडीओ पाहून मी सुद्धा भारावून गेलेय” अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या जिनिलिया आणि तिच्या पुतणीच खास बॉण्ड असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

Tags: deshmukh familyentertainmentgenelia deshmukh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Diwali Puja 2025

दिवाळी २०२५ : दिवाळीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मुख्य दारात ठेवा 'या' गोष्टी, मिळेल आशीर्वाद आणि होईल भरभराट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.