रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याचा स्वभाव…”, विकी जैनबरोबरच्या पार्टीतील व्हायरल फोटोवर इशा मालवीयची प्रतिक्रिया, म्हणाली, “घरी गेले होते तेव्हा…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 30, 2024 | 1:48 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Isha malviya reveals truth behind Vicky jains viral romantic photo ee the details

“त्याचा स्वभाव...”, विकी जैनबरोबरच्या पार्टीतील व्हायरल फोटोवर इशा मालवीयची प्रतिक्रिया, म्हणाली, “घरी गेले होते तेव्हा...”

Bigg Boss 17 Updates : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय व चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. नुकताच ‘बिग बॉस’चे १७वे पर्व संपले असून मुनव्वर फारुकी हा पर्वाचा विजेता ठरला. मनारा चोप्रा, अरुण माशेट्टी, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अभिषेक कुमार या ५ स्पर्धकांमध्ये ही अंतिम लढत झाली होती आणि यात मुनव्वरने बाजी मारत विजेतेपदावर त्याचे नाव कोरले आहे.

बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याच्या अगदी नजीक जाताच या घरातील विकी जैनचा प्रवास संपला होता. घराबाहेर येताच विकी जैन त्याच्या पार्टीमुळे चांगलाच चर्चेत आला होता. पत्नी अंकिता बिग बॉसच्या घरात असताना विकी जैन एकटा काही मैत्रिणींबरोबर पार्टी करताना दिसला. या पार्टीच्या व्हायरल झालेल्या फोटोंमधून विकी एका मुलीबरोबर रोमॅन्टिक पोज देताना दिसला होता. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंकिताच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट करत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

View this post on Instagram

A post shared by Purva Rana (@purva_rana)

आणखी वाचा – “मी ब्राम्हण आहे, सवलत नको…”, पुष्कर जोगच्या जातीवरील प्रकरणावर शरद पोंक्षेंचीही प्रतिक्रिया, म्हणाले,, “ते घरी आल्यानंतर…”

यावर आता ‘बिग बॉस’मधीलच स्पर्धक इशा मालवीयने तिची प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टंट बॉलीवूड’ला दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने विक्की जैनच्या स्वभावाबद्दल, विशेषत: स्त्रियांबद्दलच्या त्याच्या वागणुकीबद्दल सांगितले. यावेळी ती असं म्हणाली की, “मी दोन दिवसांपूर्वी विकी भाईच्या घरी गेले होते. तेव्हा तिथे विक्की भाईची सासू म्हणजेच अंकिताची आई तिथे होती, तसेच त्याचे चुलत भाऊही तिथे होते. त्या पार्टीचा एक फोटो समोर आला ज्यामध्ये आम्ही सर्वांनी काळे कपडे घातले होते. तसेच त्यात आयेशा, मी, सना, विकी भाई आणि त्याचा चुलत भाऊ हे दिसत आहेत”

आणखी वाचा – अक्षय कुमारच्या लेकीला कुत्रा चावला अन्…; बायकोने सांगितला ‘तो’ थक्क करणारा प्रसंग, म्हणाली, “त्याने…”

या व्हायरल फोटोवरुन झालेल्या ट्रोलिंगबद्दल इशा असं म्हणाली की, “तो असं अजिबातच नाही. लोकं यावरुन त्यांना का ट्रोल करत आहेत, माहीत नाही, विकीचा तो स्वभावच आहे की लोकांना सुरक्षित करणे. ‘बिग बॉस’च्या घरातही त्याची मनाराबरोबरची मैत्री हे याचेच एक उदाहरण होते.”

Tags: bigg bossbigg boss 17bigg boss 17 newsbigg boss newsisha malviyavicky jainईशा मालवीयबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस १७. बिग बॉस १७ बातमीबिग बॉस बातमीविकी जैन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Pushkar Jog And Ketaki Chitale Troll

"शहाणपणा शिकवायचा असेल तर…", जातीवादावरुन राष्ट्रवादी नेत्याचा केतकी चितळे व पुष्कर जोगला टोला, म्हणाले, "सरकारच्या आदेशाने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.