मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साऊथ सुपरस्टारचा २७ वर्षांचा संसार मोडला, दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर अफेअर म्हणत पत्नीचे गंभीर आरोप

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 28, 2026 | 10:12 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
thalapathy vijay sangeetha divorce

साऊथ सुपरस्टारचा २७ वर्षांचा संसार मोडला, दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर अफेअर म्हणत पत्नीचे गंभीर आरोप

thalapathy vijay sangeetha divorce : साऊथ फिल्म्सचा सुपरस्टार थलपति विजय आणि त्याची पत्नी संगीता यांचा २७ वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोट झाला आहे. पत्नीने अभिनेत्याकडून घटस्फोट मागितला आहे. वृत्तानुसार, संगीताने थलपति विजयपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. संगीता सोरनलिंगम आणि थलपति थलपथी विजय यांचा विवाह २५ ऑगस्ट १९९९ रोजी झाला होता. असा दावा केला जात आहे की, थलपति विजयचे एका अभिनेत्रीसोबत अवैध संबंध आहेत आणि त्यामुळे ही परिस्थिती घटस्फोटापर्यंत पोहोचली आहे.

थलपति विजयवर पत्नीचे आरोप
‘पिंकविला’च्या वृत्तानुसार, संगीता सोरनलिंगम यांच्या याचिकेची एक प्रत इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. असे सांगितले जात आहे की, संगीताने आरोप केला आहे की थलपति विजयचे एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध होते, ज्याची तिला एप्रिल २०२१ मध्ये माहिती मिळाली. विजयने पत्नी संगीताला आश्वासन दिले होते की तो अभिनेत्रीसोबतचे नाते संपुष्टात आणेल. मात्र, थलपति विजयने तसे केले नाही, तर अफेअर सुरुच ठेवले, त्यामुळे पत्नी संगीता यांना भावनिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला, असा दावा केला जात आहे. याव्यतिरिक्त, थलपति विजयच्या पत्नीने आरोप केला आहे की अभिनेत्याने तिचे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि आर्थिक सुरक्षा देखील मर्यादित केली आहे. याचाही त्याला त्रास झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार, थलपति विजय अभिनेत्रीसोबत परदेशात फिरत होते आणि सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत होते.

आणखी वाचा – १५ व्या वर्षी वडिलांनी घर सोडलं, आईने विष देण्याचा…; ‘शक्तिमान’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…

संगीता सोरनलिंगम यांनी तिच्या याचिकेत असेही म्हटले आहे की, अभिनेत्री तिचे पती थलपति विजयसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत राहिल्या आणि या पोस्टमुळे तिचा आणि तिच्या मुलांचा वारंवार अपमान झाला. सध्या, रिपोर्ट्सनुसार, थलपति विजयवर पत्नीचा त्याग, व्यभिचार आणि मानसिक क्रूरतेचा आरोप आहे. घटस्फोटाच्या याचिकेत संगीता सोरनलिंगमने तिच्या अभिनेता पतीकडून अंतरिम भरणपोषण आणि कायमस्वरूपी पोटगी मागितली आहे. मात्र, या बातम्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आणखी वाचा – Video : लग्नानंतर पहिल्यादांच कॅमेरासमोर आलं नवविवाहित जोडपं, रश्मिका-विजयच्या चेहऱ्यावरील ग्लोची चर्चा

विजयबद्दल सांगायचे तर, २०२६ मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याने अभिनयातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने २०१४ मध्ये TVK नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. थलपति विजय यांनी जाहीर केले होते की तो अभिनयातून निवृत्त होत आहे आणि आता भविष्यात जनतेची सेवा करेल. विजयचा शेवटचा चित्रपट ‘जाना नायकन’ हा रिलीज होणार होता, पण तो कायदेशीर अडचणीत अडकला आहे आणि रिलीज झालेला नाही. आणि आता याच दरम्यान विजयच्या पत्नीपासून घटस्फोटाची बातमी चर्चेत आहे.

Tags: south industrythalapathy vijaythalapathy vijay sangeetha divorce
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
mata sanman 2026 nomination

'मटा सन्मान २०२६' ची नामांकने जाहीर, 'इट्स मज्जा' ओरिजिनलच्या 'दहावी-अ' व 'पाऊस २' ने मारली बाजी, तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.