Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आमिर खान व रीना दत्ताची लेक आयरा खान हिच्या लग्नाची धामधूम सर्वत्र पाहायला मिळाली. अगदी शाही थाटामाटात आमिरने तिच्या लेकीचा लग्नसोहळा पार पाडला. लग्नसोहळा पार पडल्यानंतर आयरा खान व नुपूर शिखरेच्या लग्नाची चर्चा काही थांबलेली नाही. अशातच आयराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लग्नसोहळ्यातील न पाहिलेल्या काही क्षणांचा व्हिडीओ शेअर केला आहे. उदयपूरमध्ये झालेल्या ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या लग्नाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये आमिरपासून ते नुपूरपर्यंत सगळेच भावूक झालेले दिसत आहेत. सर्वांनी एकत्र नाचत धमाल केलेली ही पाहायला मिळत आहे. आमिरने त्याच्या विहीणबाईंसह डान्स केला, तर नुपूरने सासू रीनाबरोबर डान्स केला. दोन्ही कुटुंबाची अनोखी बॉन्डिंग पाहून चाहते या व्हिडीओवर भरभरुन कौतुक करत आहेत. इरा खानने इन्स्टाग्रामवर लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आयरा तिच्या वडिलांसह व आईसह एन्ट्री घेत आहे. नूपुरसह वैदिक पद्धतीने लग्नबंधनात अडकताच दोघेही एकमेकांना लिप किस करताना दिसले.
लाडक्या लेकीच्या लग्नात आमिर खानच्या डोळ्यात पाणी आले. शिवाय त्याची पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ताही भावुक झाली यावेळी आमिर तिचा हात धरताना दिसला. या लग्नात आमिरची दुसरी पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावही लेक आझादसह सहभागी झाली होती.
या व्हिडीओमध्ये, लग्नानंतर सर्वजण थिरकताना दिसत आहेत. याशिवाय आयरा व नुपूर यांच्या दोन पद्धतीच्या लग्नानंतर शनिवारी मुंबईत भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला. या रिसेप्शन सोहळ्यात संपूर्ण बॉलीवूड अवतरलं होतं. या सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले. आयरा व नुपूर यांनी नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा उरकला. त्यानंतर शाही थाटामाटात त्यांचा लग्न सोहळा उरकण्यासाठी ही जोडी उदयपूर येथे रवाना झाली. उदयपूर येथील ताज पॅलेस येथे आयरा व नुपूर यांचा मेहंदी, संगीत व शाही लग्नसोहळा पार पडला.