गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आमिर खानची लेक आयराच्या ग्रँड रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी, खास लूकमध्ये हजेरी लावली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 14, 2024 | 10:20 am
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Ira Khan-Nupur Shikhare Wedding

आयरा खान-नुपूर शिखरे लग्न

Nupur Shikhare and Ira Khan Marriage : बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या लेकीचा शाही विवाहसोहळा उरकताच मुंबईत त्यांच्या भव्य रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील जियो वर्ल्ड येथे हा भव्यदिव्य सोहळा संपन्न झाला. याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळाले. या सोहळ्याला सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळींनी, तसेच कलाकारांनी हजेरी लावून या सोहळ्याची रंगत वाढविली.

आयरा खान व नुपूर शिखरे त्यांच्या रिसेप्शनवेळी परिधान केलेल्या खास लूकमध्ये जबरदस्त दिसत होते. इराने परिधान केलेला लाल रंगाचा डिझाइनर लेहेंगा व ब्लाउज खास दिसत होता. तर काळ्या रंगाची शेरवानी परिधान केलेला नुपूर एका देखण्या राजकुमारासारखा दिसत होता. तर बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान लेकीच्या लग्नात काळ्या रंगाच्या नवाबी पोशाखात पाहायला मिळाला. लेकीच्या रिसेवशां सोहळ्याला आलेल्यांची उठबस करतानाही तो दिसला. लेकीच्या लग्नासाठी आमिर खान एकूणच आनंदी असलेला पाहायला मिळाला.

आणखी वाचा – प्रवाशांना कोंडून ठेवंल अन्…; मुंबई विमानतळावर सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला विचित्र अनुभव, पाणीही प्यायला नाही आणि…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

भाईजान सलमान खानही या नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी काळ्या रंगाच्या थ्री-पीस सूटमध्ये आला आणि त्याच्या स्वॅगने त्याने केलेली एंट्री लक्षवेधी ठरली. कतरिना कैफनेही आयराच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती. कतरीनाने परिधान केलेला भव्य मॉडर्न व पारंपरिक टच असलेला लेहेंगा सेट खूप सुंदर होता. रणबीर कपूरने त्याचा मित्र आमिरच्या मुलीच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी ऑफ व्हाईट रंगाचा आकर्षक पोशाख परिधान केला होता. आयराच्या रिसेप्शन पार्टीला वेलकम अभिनेता अनिल कपूर आणि दाक्षिणात्य स्टार नागा चैतन्य देखील उपस्थित होते. दोन्ही अभिनेत्यांनी पोज देत एकमेकांना शुभेच्छा दिलेल्याही पाहायला मिळाल्या. तसेच जया बच्चन व लेक श्वेता बच्चनही या सोहळ्याला उपस्थित होत्या. नेहमीप्रमाणे यावेळी ही जया बच्चन पापराजींवर भडकताना दिसल्या.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – “कॅन्सर होण्याची शक्यता”, ऐश्वर्या नारकरांनी जेवण बनवतानाचा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्याचा सल्ला, म्हणाल्या, “मी आता…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लिन लैश्राम व रणदीप हुडा हे नवविवाहित जोडपं आशीर्वाद देण्यासाठी या सोहळ्याला उपस्थित होते. तर काळ्या रंगात फरहान अख्तर व शिबानी दांडेकर यांचा मॅचिंग ड्रेसकोड साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता. याशिवाय बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंतचे अनेक कलाकार या भव्य रिसेप्शनमध्ये सहभागी झाले होते. सचिन तेंडुलकर, अनिल कपूर, नागा चैतन्य, हेमा मालिनी, जया बच्चन, राज ठाकरे, बाबिल खान, सोनाली बेंद्रे, सूर्या यांसारख्या अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.

Tags: aamir khan daughter weddingbollywood celebrityentertainmentira khanira khan and nupur shikhare receptionnupur shikhare
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Nupur Shikhare and Ira Khan Wedding Marathi News

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये मराठमोळ्या जोडीची हवा, रिंकू राजगुरू व आकाश ठोसर एकत्र पोहोचले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.