‘इंडियन आयडल १२’चा विजेता व गायक पवनदीप राजनबाबत सोमवारी (५ मे) एक धक्कादायक बाब समोर आली. पवनदीपचा भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं. त्याच्या अपघातादरम्यानचे फोटो समोर आले. त्यानंतर अपघाताची भीषणता किती असू शकते? हे प्रथमदर्शनीच लक्षात आलं. त्याचबरोबरीने पवनदीपला लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान रुग्णालयातील त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये पवनदीपला ओळखणंही कठीण झालं होतं. त्याच्या शरीरावर जखमा तसेच फ्रॅक्चर दिसत होतं. अपघातानंतर त्याच्या कुटुंबाने काहीही बोलणं टाळलं होतं. मात्र आता पवनदीपच्या टीमकडून एक माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याचं यामधून सांगण्यात आलं आहे. (Pawandeep rajan accident health update)
अनेक फ्रॅक्चर, जखमा अन्…
पवनदीपच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे टीमकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्याची आताची परिस्थिती नेमकी कशी आहे? याबाबतची माहिती देण्यात आली. टीमने म्हटलं की, “तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की, पवनदीप राजनचा भीषण अपघात झाला. ५ मेला सकाळी उत्तरप्रदेशमधील मोरादाबाद हायवेला हा अपघात घडला. दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी तो निघाला होता. पुढे अहमदाबादमध्ये त्याचा शो होता. अपघात झाल्यानंतर त्याला हायवेजवळीलच एका रुग्णालयात तात्काळ उपचारांसाठी नेण्यात आलं. मात्र गंभीरता पाहता दिल्ली येथील रुग्णालयात पवनदीपला घेऊन जाण्यात आलं”.
आणखी वाचा – पवनदीप राजनची अपघातानंतर वाईट अवस्था, आयसीयुमध्ये दाखल करताच…; डोक्यालाही गंभीर दुखापत
शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आलं तेव्हा…
त्याला काही ठिकाणी फ्रॅक्चर झालं आहे. तर काही छोट्या-मोठ्या जखमा झाल्या आहेत. कालचा दिवस पवनदीपच्या कुटुंबियांसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी खूप कठीण होता. अपघाताचा संपूर्ण दिवस त्याला खूप त्रास सहन करावा लागला. त्याला काही कळतही नव्हतं. बऱ्याच चाचण्या, तपासणी आणि रिपोर्ट केल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं”.

पवनदीपवर सहा तास शस्त्रक्रिया
“तब्बल सहा तास त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जिथे जिथे मोठे फ्रॅक्चर होते तिथे आधी ऑपरेट करण्यात आलं. आता तो आयसीयुमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. तीन-चार दिवसांनंतर फ्रॅक्चर व इतर दुखापत या संदर्भात पुन्हा ऑपरेशन होणार आहे. चाहते, मित्र परिवार, कुटुंबिय यांची प्रार्थना, प्रेम यामुळे तो आता हळूहळू ठिक होत आहे. तुम्ही पवनला जे प्रेम देत आहात त्यासाठी खरंच तुम्हा सगळ्यांचे आभार”. पवनदीप लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून चाहते सतत प्रार्थना करत आहेत. तसेच कुटुंबियही त्याची अधिकाधिक काळजी घेत आहेत.