बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Holi 2024 : या होळीला चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी, आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता, जाणून घ्या काय करावं आणि काय करु नये

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 20, 2024 | 5:16 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
holi 2024 dos and don't

Holi 2024 : या होळीला चुकूनही करु नका 'या' गोष्टी, आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता, जाणून घ्या काय करावं आणि काय करु नये

वर्षभरातील रंगाचा सण म्हणून ‘होळी’ हा सण ओळखला जातो. हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात. भारतामध्ये प्रत्येक सणाला काही पारंपारिक व वैज्ञानिक दृष्टिकोण असतो. त्यामुळे काही ना काही समजुती व प्रथा सणाशी निगडीत आहेत. प्रत्येक व्यक्ती ही स्थळ, काळ, विचार यानुसार सण साजरे करत असते. पण सण साजरे करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्या सणाचे चांगले परिणामही पाहायला मिळतात. (holi 2024 dos and don’t)

दरवर्षी होळी पेटवून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण फाल्गुन माहिन्यात कृष्ण पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात येतो. या वर्षी होळी २४ मार्च २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे. पण होळी पेटवण्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करु नयेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

आणखी वाचा – समीर वानखेडेंचा राखी सावंतविरोधात मानहानीचा दावा, अभिनेत्रीच्या ‘त्या’ विधानानंतर प्रकरण वाढलं, म्हणालेली, “गिधाड बनून मुलांवर हल्ला…”

सर्वात आधी जाणून घेऊया होळीच्या दिवशी काय करु नये ?

होळी पेटवताना जरूर सहभाग घ्यावा. तसेच काही कारणामुळे तिथे हजर राहणं शक्य नाही तर दुसऱ्या दिवशी सुर्योदयापूर्वी होळीच्या  भोवती तीन प्रदक्षिणा माराव्यात.

जर तुम्हाला पैशांची गरज असेल किंवा कोणाकडून उधारीने पैसे घ्यावे लागले तर होळी पेटवण्याच्या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. असे केल्यास तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

होळी पेटवण्याच्या वेळी आगीमध्ये आपल्या आपल्या घरातील कचरा टाकू नये. असे करणे शास्त्रामध्ये योग्य मानले जात नाही.

जर तुम्ही होळी पेटवण्यासाठी जात असाल तर कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये. तुम्ही तांदूळ, किंवा शेणी घेऊन जाऊ शकता आणि त्याची तुम्ही अग्नीमध्ये आहुती देऊ शकता. तुम्ही गहू किंवा हरभरा अग्नीमध्ये भाजून तो प्रसाद म्हणून ग्रहण करु शकता.

तसेच होळी पेटवण्यासाठी जात असताना माहिलांनी केस मोकळे सोडू नये. या दिवशी नकारात्मक शक्ती अधिक प्रभावशाली असतात असे मानले जाते.

आणखी वाचा – सासू-सूनेची भांडणं खान कुटुंबाला ठरली घातक, सैफ अली खानचा १३ वर्षांचा संसार मोडला कारण…; बहिणींकडूनही संसारात हस्तक्षेप आणि…

आता जाणून घेऊया की होळीच्या दिवशी काय करावे ?

होळी पेटवण्यासाठी तुम्ही जेव्हा जाणार असाल तर स्वतःजवळ काजळाची डबी ठेवावी.

जर नजर लागण्याची शक्यता असेल तर नारळ स्वतः भोवती सात वेळा फिरवावा आणि तो अग्नीमध्ये समर्पित करावा.

उटण शरीराला लाऊन जो मळ निघेल तो अग्नीमध्ये समर्पित करावा. यामुळे आरोग्यप्राप्ती होते.

Tags: colourful festivaldo and don’tholiholi festivalholika dahan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Priya Malik Instagram post

"आयुष्यच संपतं जेव्हा…", मुल झाल्यानंतर स्त्रिया शहीद होत असल्याचं सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं विधान, म्हणाली, "हे ओझं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.