शनिवार, मे 31, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Housefull 5 : ‘हाऊसफुल ५’च्या चार मिनिटांच्या ट्रेलरमध्ये संपूर्ण चित्रपटच दाखवला, प्रेक्षकांनी आताच ठरवलं बघायचा की नाही?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 27, 2025 | 3:37 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
housefull 5 movie trailer

Housefull 5 : ‘हाऊसफुल ५’च्या चार मिनिटांच्या ट्रेलरमध्ये संपूर्ण चित्रपटच दाखवला

Housefull 5 Movie : गेले कित्येक महिने ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. अखेरीस चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. ‘हाऊसफुल ५’चा जवळपास चार मिनिटांचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलरमधून चाहत्यांनाही एकापेक्षा एक दमदार सरप्राइज मिळाले आहेत. ‘हाऊसफुल’च्या पहिल्या चार भागांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवरही गाजलेले हे चारही चित्रपट पाहता पुढचा भागही शूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘हाऊसफुल ५’मध्य फक्त मॅडनेस आणि मॅडनेसच अनुभवायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमध्ये दिसत आहे. तसेच बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची फौज चर्चेचा विषय ठरत आहे. (housefull 5 movie trailer)

‘हाऊसफुल ५’च्या ट्रेलरची सुरुवातच एका अलिशान जहाजाने होते. रंजीत दोबरियाल त्याचा १००वा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी जहाज बूक करतो. जिथे जोरदार पार्टी करण्याचं नियोजन होते. बिल किती हे जगजाहिर करण्यासाठी रणजीत पार्टीचा खटाटोप करतो. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांचीही झलक दिसते. रणजीत ट्रेलरमध्ये बोलतात की, माझ्या संपत्तीचा खरा वारसदार माझा मुलगा जॉली आहे. पण रितेश देशमुख, अभिषेक बच्चन आणि अक्षय कुमार स्वतः रणजीतचा मुलगा जॉली असल्याचं म्हणवून घेतात.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीला अश्लील मॅसेज करणारा ‘तो’ मराठी अभिनेता नक्की कोण?, ‘सेक्सी’ म्हणूनही डिवचलं अन्…

पाहा ट्रेलर

आता नक्की जॉली कोण?, संपत्तीचा खरा वारसदार कोण?, हे समजून, जाणून घेण्यात मजा-मस्ती घडते. तसेच चित्रपटाची कथाही याच भोवती फिरताना दिसते. तब्बल १९ कलाकार या चित्रपटात काम करत आहेत. तसेच प्रत्येकाची भूमिकाही विशेष लक्षवेधी ठरत आहे. नाना पाटेकर, अक्षय कुमार, रितेश देशमुख, चंकी पांडे, चित्रांगदा सिंह, फरदीन खान, जॉनी लिवर, श्रेयस तळपदे, नरगिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ आदी कलाकार चित्रपटात दंगा घालताना दिसणार आहेत.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी, मोठी रक्कम आणि दागिने लंपास, बहिणीच्या लग्नाची सुरु होती तयारी अन्…

साजिद नाडियाडवाला निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण मनसुखानीने केलं आहे. ट्रेलर पाहूनच चित्रपट बघाला की नाही? हे प्रेक्षकांनी ठरवलं आहे. विविध प्रतिक्रिया देत ‘हाऊसफुल ५’बाबत प्रेक्षकांनी मत मांडलं. चित्रपट कधी प्रदर्शित होतो असं झालंय, संवाद एक नंबर, अक्षय कुमार खूपच आवडला, नाना पाटेकरांसाठी चित्रपट बघणार, अखेर एक ब्लॉकबस्टर चित्रपट येत आहे अशा विविध कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत. येत्या ६ जूनला चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

Tags: akshay kumarbollywood newsriteish deshmukh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Vaishnavi Hagawane Death
Social

हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात, नेपाळ बॉर्डरवर केलं अटक, वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केली आणि…

मे 31, 2025 | 11:14 am
Javed Akhtar Statement
Entertainment

“शबाना व मी रस्त्यावर झोपायचो…”, जावेद अख्तर यांनी सांगितला ‘तो’ कठीण काळ, म्हणाले, “मुस्लिमांना…”

मे 31, 2025 | 10:41 am
Yuvika Chaudhary Pregnancy
Lifestyle

युविका चौधरीसाठी गरोदर राहणं होतं इतकं कठीण, शेवटी IVF चा अवलंब करावा लागला कारण…

मे 30, 2025 | 6:30 pm
Bharti singh Harsh limbachiya
Entertainment

“आम्ही कर्ज काढून जगतोय”, भारती सिंह व तिच्या नवऱ्याचा वाईट काळ, स्वतःच केला खुलासा, कमी पैसे मिळतात अन्…

मे 30, 2025 | 6:27 pm
Next Post
Prathamesh Parab Wife Video

"तुला डोकं नाही आहे", प्रथमेश परबच्या बायकोला नेटकऱ्याने हिणवलं, म्हणाली, "माझं कौतुक म्हणून स्वीकारते आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.