रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात, नेपाळ बॉर्डरवर केलं अटक, वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केली आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 31, 2025 | 11:14 am
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Vaishnavi Hagawane Death

हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात, नेपाळ बॉर्डरवर केलं अटक, वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केली आणि…

Vaishnavi Hagawane Death : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आता वेगळंच वळण घेताना दिसत आहे. सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून वैष्णवीने वयाच्या २३ व्या वर्षी गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूला तिच्या सासरच्या मंडळींना जबाबदार धरले. पती शशांक हगवणे, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना सर्वप्रथम अथक कऱण्यात आली. यावेळी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांनी पळ काढला, मात्र वैष्णवीच्या मृत्यूच्या सात दिवसांतच त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. वैष्णवी हगवणे प्रकरणात आणखी एका व्यक्तीच नाव आलं. मात्र ती व्यक्तीही पसार असल्याचं निदर्शनास आलं. ही व्यक्ती म्हणजेच निलेश चव्हाण.

शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादात निलेश अनेकदा सहभागी असायचा. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे नऊ महिन्यांचे बाळ हे निलेशकडे होते. ही महत्त्वाची माहिती जेव्हा तिच्या माहेरच्यांना कळली तेव्हा २० मे रोजी वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता, निलेशने त्यांना पिस्तुल दाखवून घाबरवले आणि घराबाहेर हाकलून लावले. तसेच बाळाचा ताबा देण्यासही त्याने स्पष्ट नकार दिला होता. यानंतर कस्पटे कुटुंबीयांच्या (वैष्णवीच्या माहेरच्यांच्या) तक्रारीवरून निलेश चव्हाण याच्याविरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याच्या आणि पिस्तुलाचा धाक दाखवत दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी वाचा – “चार लोकंही शो ऐकत नाहीत”, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर कुणाल कामराने सुनावलं, म्हणाला, “लवकरच मुंबईत शो करणार आणि…”

कालांतराने, एका सराईत व्यक्तीमार्फत निलेश चव्हाणने वैष्णवीच्या बाळाला कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्त केले आणि स्वतः मात्र फरार झाला. वैष्णवीची सासू आणि नणंद यांचे फोनही निलेशच्या ताब्यात असल्याचं समोर आलं. वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे हिचा तो मित्र असल्याची माहिती आहे. या सगळ्या प्रकरणात आपण अडकले जाऊ म्हणून निलेशने पळ काढला. मात्र, काल नेपाळ बॉर्डरवर निलेशला पकडण्यात यश आले.

आणखी वाचा – “वैष्णवीबरोबर झालं ते चूक आहे”, गौतमी पाटील स्पष्टच बोलली, बैलासमोर नाचलेल्या व्हिडीओवरही केलं भाष्य, म्हणाली…

नीलेश चव्हाण गेले १० दिवस फरार होता. सुरुवातीला तो पुण्यातून रायगड येथे गेला. तेथून दिल्लीला गेला. त्यानंतर दिल्ली, गोरखपूरमार्गे सौनौली, भैरहवमार्गे नेपाळ सीमेवरील काठमांडू असा प्रवास करत तो नेपाळमध्ये गेला. त्यानंतर तो भैरहव येथून उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील सौनौली येथे आला. त्याची माहिती मागावर असलेल्य पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आता निलेशच्या उत्तरांनी वैष्णवी प्रकरण कोणतं वेगळं असं वळण घेणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: dowry newspune crime newsVaishnavi Hagawane death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Titeeksha Tawade first wedding anniversary

नणंदेकडून तितीक्षा तावडेला खास सरप्राइज, गिफ्ट पाहून भारावली अभिनेत्री, खास व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.