सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मुलांबरोबर जमिनीवरच बसला अन्…; Ed Sheeran मुंबईच्या शाळेमध्ये पोहोचताच साधेपणानं वेधलं लक्ष, चाहतेही भारावले, व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 13, 2024 | 1:20 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Ed sheeran instagram video

Video : मुलांबरोबर जमिनीवरच बसला अन्...; Ed Sheeran मुंबईच्या शाळेमध्ये पोहोचताच साधेपणानं वेधलं लक्ष, चाहतेही भारावले, व्हिडीओ व्हायरल

संगीताला भाषा नसते असं म्हणतात त्याचा प्रत्यय आता येत आहे. काही दिवसांपूर्वीच हॉलिवूड पॉपस्टार रिहानाने अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यामध्ये रिहानाने तिच्या काही प्रसिद्ध गाण्यांवर परफॉर्मन्स सादर केले होते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अशातच आता प्रसिद्ध हॉलिवूड गायक एड शिरन हा मुंबईमध्ये दाखल झाला आहे. मुंबईमध्ये १६ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमासाठी तो मुंबईमध्ये आला आहे. यादरम्यान त्याने मुंबईमधील एका शाळेला भेट दिली. यावेळी त्याने मुलांबरोबर मजा मस्ती केली, गाणी गायली आहेत. हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Ed sheeran instagram video)

त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शाळेतील मुलांबरोबरचा व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यावर त्याने कॅप्शन लिहिले आहे की, “आज सकाळी मी मुंबईमधील एका शाळेला भेट दिली आणि मुलांबरोबर गाणे गाऊन खूप धमाल मस्ती केली. भारतामध्ये येऊन आनंद झाला”.  

आणखी वाचा- बायकोला पुरस्कार मिळताच नाचू लागला प्रसाद जवादे, पुरस्कार मिळाल्यानिमित्त अमृताला देणार ‘हे’ खास गिफ्ट, म्हणाला…

View this post on Instagram

A post shared by Ed Sheeran (@teddysphotos)

गायक एड शिरन हा भारतात २०१५ व २०१७ सालीही आला होता. तो तिसऱ्यांदा भारतात आला आहे. याआधी तो आला होता तेव्हा त्याचे अनेक बॉलिवूड कलाकारांबरोबरचे फोटो व्हायरल झाले होते. २०१७ मध्ये चित्रपट दिग्दर्शक व कोरिओग्राफर फराह खानने तिच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. एड शिरनचा १६ मार्चला महालक्ष्मी रेसकोर्सवर कॉन्सर्ट आयोजित केला आहे.

आणखी वाचा- “आई-वडील नसणं हे फायद्याचं असतं”, संजय दत्तची लेक त्रिशला असं का म्हणाली?, कारण सांगत पोस्टही केली शेअर

त्याला आतापर्यंत  त्याच्या गाण्यांसाठी ब्रिट अवॉर्ड्स व ब्रिटिश ब्रेक थ्रू अवॉर्ड मिळाले आहेत.तसेच ‘शेप ऑफ यू’ या गाण्यामुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. हे गाणे केवळ ब्रिटनमध्येच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले. तब्बल ४४ देशांमध्ये हे गाणे पहिल्या क्रमांकावर होते. याबरोबरच ‘परफेक्ट’, ‘आय डोन्ट केअर’, ‘बॅड हॅबिट्स’, ‘शिव्हर्स’ ही गाणीदेखील प्रसिद्ध आहेत.

Tags: concertconcert in MumbaiEd sheeranHollywood singerlive concert in Mumbaishape of you song
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Dil Dosti Duniyadari fame Amey Wagh shared a video of singing bhajan on social media

Video : यालाच म्हणतात संस्कार! गावी जाऊन भजनी मंडळींमध्ये रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, अंगणात बसून भजन गातानाचा व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.