अनेक कलाकार नाकारातमक भूमिका करून देखील प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडत असतात. ऑस्कर विजेत्या RRR चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणारा तसेच मारवेलच्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता रे स्टीवेन्सनच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.(Ray Stevenson Death)
RRR चित्रपटाच्या ऑफिशिअल अकॉउंट वरून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. रे स्टीवेन्सन ने RRR सोबतच अनेक मारवेल्स चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत. तर बॉलीवूड सोबतच हॉलिवूड ही गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या जाण्याने RRR टीम सोबतच संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

58 वर्षीय रे स्टीव्हनसन थोर आणि त्याचा सिक्वेल थॉर: द डार्क वर्ल्ड सारख्या अनेक मार्वल चित्रपटांमध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने व्होल्स्टॅगची भूमिका केली होती. भारतीय चित्रपटांमधील फक्त RRR या चित्रपटात त्यांनी काम केले होते. आपल्या उत्तम खलनायकी भूमिकेतून त्यांनी या चित्रपट एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती.(Ray Stevenson Death)