हॉलिवूड विश्वातून नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता जॉनी व्हॅक्टरची याची हत्या करण्यात आली आहे. जॉनी व्हॅक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे असल्याचे वृत्त समोर येत आहे. अभिनेत्यावर लॉस एंजेलिसमध्ये काही चोरट्यांनी हल्ला केला होता. यानंतर अभिनेत्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जॉनीच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
काही आंतरराष्ट्रीय वृत्तांनुसार, जॉनी व्हॅक्टरची २५ मे, शनिवार रोजी हत्या करण्यात होती. अभिनेत्याच्या आईने या घटनेबद्दल असं म्हटलं की, शनिवारी पहाटे ३ वाजता काही चोर जॉनीच्या कारमधून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याचा प्रयत्न करत होते. अभिनेत्याच्या आईने दावा केला की, अभिनेत्याने चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. तरीही चोरांनी त्याला गोळ्या घातल्या.
आणखी वाचा – ‘सिंह’ व ‘तूळ’ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होणार, इतर राशींच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या…
जॉनीचा मित्र डेव्हिड शॉलने त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘पीपल मॅगझिन’शी बोलताना डेव्हिडने जॉनीची आठवण ‘अद्भुत व्यक्ती’ म्हणून केली. मित्राविषयी आपल्या भावना व्यक्त करताना त्याने असं म्हटलं की, “तो खूप प्रतिभावान होता. त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी तो एक अद्भुत व्यक्ती होता. त्याने आयुष्यात अनेक कठोर परिश्रम केले आणि कधीही हार मानली नाही. व्यावसायिक जीवनातही त्याने आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. त्यामुके अशा व्यक्तीच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्यावर प्रेम करण्याऱ्या सर्वांनाच धक्का बसला आहे”.
आणखी वाचा – विरोचकालाही पाचव्या पेटीचे संकेत, नेत्रा व रुपाली यांच्यापैकी नक्की कुणाच्या हाती लागणार पंचपिटीका?
‘जनरल हॉस्पिटल’ व्यतिरिक्त जॉनीने ‘एनसीआयएस’, ‘द ओए’, ‘वेस्टवर्ल्ड’, ‘द पॅसेंजर’, ‘स्टेशन 19’, ‘बार्बी रिहॅब’, ‘सायबेरिया’, ‘एजंट एक्स’, ‘ व्हँटास्टिक’, ‘ॲनिमल किंगडम’, ‘हॉलीवूड गर्ल’, ‘ट्रेनिंग डे’ आणि ‘क्रिमीनल माइंड्स’सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच त्याच्या या आकस्मिक निधनाने त्याच्या कुटुंबियांसह अनेक चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.