शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

होळीच्या आधीचे आठ दिवस अशुभ का मानले जातात?, होळाष्टक म्हणजे नक्की काय?, ‘या’ दिवसांत काय शुभ आणि काय अशुभ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 15, 2024 | 8:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Holashtak 2024 Date

होळीच्या आधीचे आठ दिवस अशुभ का मानले जातात?, होळाष्टक म्हणजे नक्की काय?, 'या' दिवसांत काय शुभ आणि काय अशुभ

होळी हा संपूर्ण देशात साजरा होणारा एक प्राचीन सण आहे. देशभरात सर्वच प्रदेशांमध्ये हा रंगांचा सण साजरा होतो. प्रत्येक प्रदेशात हा सण साजरा करण्याची पद्धत, परंपरा वेगवेगळी असली तरी उत्साह आणि आनंद सारखाच असतो. होळीच्या आठ दिवस आधी होळाष्टक येते. होळाष्टकादरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. होळीच्या ८ दिवस आधी म्हणजेच फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून होळाष्टकास सुरुवात होते. होळाष्टक कधी पाळले जाते आणि ते अशुभ का मानले जाते याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (Holashtak 2024 Date)

यंदाच्या होळीची चाहूल सुरु झालेली पाहायला मिळत आहे. कॅलेंडरनुसार, यावर्षी होळीचा सण २४ व २५ मार्च रोजी सगळीकडे साजरी केली जाणार आहे. यावेळी होलिका दहन रविवार २४ मार्च रोजी होणार आहे. तर २५ मार्च रोजी धूलिवंदन म्हणजेच रंगीत होळी साजरी केली जाणार आहे. तर १७ मार्चपासून होळाष्टकास सुरुवात होणार आहे. कारण, होळीच्या आठ दिवस आधी होळाष्टक सुरु होईल आणि २४ मार्चला संपेल.

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : ‘या’ राशींच्या व्यक्तींना गुंतवणूकीमध्ये होणार भरपूर फायदा, तर ‘या’ राशीला धनलाभ मिळणार, तुमच्या नशिबाामध्ये काय बदल होणार?

मान्यतेनुसार, होळाष्टकादरम्यान आठ ग्रह उग्र स्थितीत राहतात. अष्टमी तिथीला चंद्र, नवमी तिथीला सूर्य, दशमी तिथीला शनि, एकादशी तिथीला शुक्र, द्वादशी तिथीला गुरू, त्रयोदशी तिथीला बुध, चतुर्दशी तिथीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू. त्यामुळे होळाष्टकाच्या वेळी शुभ कार्ये केली जात नाहीत. कारण, या ग्रहांचा शुभ कार्यांवर अशुभ प्रभाव पडतो. अशा ग्रहांच्या प्रभावामुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

आणखी वाचा – घरामध्ये तुम्ही ‘या’ पाच गोष्टी करत असाल तर कधीच होणार नाही पैशांची भरभराट, वेळीच टाळा अन्यथा आर्थिक नुकसान वाढणार

होळाष्टकात भगवान विष्णू, हनुमानजी व भगवान नरसिंह यांची पूजा केली जाते, असे मानले जाते. याशिवाय हे आठ दिवस महामृत्युंजय मंत्राचा जप करणे देखील शुभ मानले जाते. याशिवाय जप केल्यास ग्रहांचा अशुभ प्रभावही काही प्रमाणात कमी होतो.

Tags: holashtakHolashtak 2024 Dateholiholi festivalholi special
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Today 16 march 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशी भविष्य : 'या' राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा, तर काही राशींसाठी आरोग्याचा धोका, जाणून घ्या तुमचा दिवस कसा असणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.