कलाकारांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे अनेक दुःख दडलेली असतात. बालपण, खासगी आयुष्य, लग्न, नातं याविषयी बोलताना बरेच कलाकार आपसूकच आपलं मनातलं सांगतात. या मुखवटा लावलेल्या चेहऱ्यामागे किती किती दुःख, वेदना दडलेल्या असतील हे त्यावेळी लक्षात येतं. अशाच एका अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा कपूरने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. मात्र याबाबत बोलत असताना आईच तिची वैरी ठरली की काय? हा प्रश्न मनात आपसूकच डोकावतो. नाव कमावलं, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं मात्र खासगी आयुष्यात सीमा यांच्या वाट्याला फारसं सुख आलं नाही. (seema kapoor torchered by own mother)
‘नागिन’, ‘एक हजारों मैं मेरी बहना है’ सारख्या मालिकांमधून सीमाने उत्तम भूमिका साकारल्या. स्वतः पडद्यावर आईची भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र प्रत्यक्षात सीमाला आईचं सुख मिळालं नाही. सीमा आईला खूप घाबरायची. सतत आईविषयी प्रेम नाही तर भीती वाटायची. ती म्हणाली, “शाळेतून कधी घरी आली तर घराला कुलूप असायचं. नंतर मला माहिती पडायचं की, आई मदर तेरेसाच्या ट्रस्टला चॅरिटीसाठी गेली आहे”.
आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान
सीमा म्हणाली, “घराला कुलूप असलं की, कित्येक तास आम्ही बिल्डींगच्या पाऱ्यांवरच बसून असायचो. शेजाऱ्यांनाच आमच्यावर दया यायची. ते आम्हाला बोलवायचे. पाणी घे, येऊन घरात बस असं सतत म्हणायचे. पण आईची इतकी मनात भिती होती की, त्यांनी घरात येऊन बसायला सांगितलं तरी आम्ही पायरी जवळून कधीच हललो नाही. तासनसात तिथेच बसून वाट बघत बसायचो”. सीमाने बालपणाच्या चांगल्या नाही तर वाईट आठवणीच मनात साठवून ठेवल्या आहेत.
पुढे तिने सांगितलं की, “आई खूपच टॉर्चर करायची. खूप जास्तच कडक शिस्तीची होती. इतकंच काय तर आम्हाला खूप मारायची. तुम्ही जेवढा विचार करत असाल त्याच्या कैक पटीने आई आम्हाला टॉर्चर करत होती. त्याला तुम्ही बाल शोषणही म्हणून शकता. इतक्या प्रमाणामध्ये माझ्याबरोबर सगळं काही घडत होतं. मित्र-मैत्रिणींच्या घरीही जेव्हा त्यांनी आई नसेल तेव्हाच जायचे. इतकं आई या शब्दाची मनात भिती राहिली होती. माझी हालत बघून ती तुझी सावत्र आई आहे का? असं मला माझ्या मैत्रिणी विचारत असायच्या”. सीमाच्या बालपणाच्या कडू आठवणी खरंच डोळे पाणावणाऱ्या आहेत.